Bharati Airtel ही एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कंपनीने देशामधील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये ग्राहकांना ओटीटीचे सब्स्क्रिप्शन आणि अनेक इतर फायदे मिळतात. आता सुद्धा कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
एअरटेल कंपनीने कोणतीही घोषणा न करता आपल्या ऑफरमध्ये ४९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन जोडला आहे. एअरटेलचा हा प्लॅन बेस प्रीपेड प्लॅन नसून डेटा बुस्टर प्लॅन आहे. डेटा बूस्टर किंवा व्हाउचर प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांच्याकडे आधीपासूनच सक्रिय बेस प्रीपेड प्लॅन आहे. तसेच ज्यांना सध्या प्लॅनमध्ये असलेल्या डेटा पेक्षा जास्त डेटाची आवश्यकता आहे. याबाबतचे वृत्त telecom talk ने दिले आहे.
भारती एअरटेलचा ४९ रुपयांचा प्लॅन
भारती एअरटेलने ग्राहकांसाठी ४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १ दिवसाची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा मिळतो. एका दिवसात वापरण्यासाठीचा अतिरिक्त डेटा आहे. ज्या भागामध्ये वाय-फाय नेटवर्क उपलब्ध नसलेल्या भागांमधील क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरू शकते.
भारती एअरटेल आता देशातील ३००० पेक्षा अधिक शहरांमध्ये ४जी आणि ५जी नेटवर्क ऑफर करते. ४९ रुपयांच्या प्लॅनमधील डेटा व्हाउचरचा वापर ४जी डेटा टॉप अप व्हाउचर म्हणून वापरले जाऊ शकते. हा नवीन प्लॅन एअरटेलला आपला सरासरी महसूल वाढवण्यात मदत करू शकते.