Amazon Sale: ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी बंपर सेल घेऊन येत आहे. या उन्हाळ्यात ऑफर्स आणि सवलतींचा पाऊस पडणार आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर समर सेलची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सवलती आणि ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आत्ताच तुमची खरेदीची लिस्ट तयार करा आणि बंपर सेलचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सवलती, ऑफर आणि नवीन लॉन्चबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Amazon च्या या सेलमध्ये iPhone 14 तुम्हाला अर्ध्या किंमतीमध्ये मिळणार आहे. आयफोन १४ वर आतापर्यंतची सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर सुरु आहे. Amazon वर Great Summer Sale आजपासून सुरु झाला आहे. ग्राहकांसाठी कंपनी आयफोनवर तगडा डिस्काउंट ऑफर घेऊन आली आहे. याशिवा Apple च्या डिव्हाइसवरदेखील डिस्काउंट मिळणार आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम

हेही वाचा : Cognizant Layoff: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची जाणार नोकरी, कारण…

जर का तुम्ही नवीन लेटेस्ट आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये आयफोन १४ अर्ध्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला आयफोन १४ यावेळी ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफरसह सेलमध्ये तुम्हाला या डिव्हाइसवर कॅशबॅक आणि Amazon पे रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.

amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन १४ ३९,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो. या फोनची मूळ किंमत ७९,९०० रुपये इतकी आहे. मात्र सेलमध्ये १५ टक्क्यांच्या डिस्काउंटसह तुम्हाला हा फोन ६६,९९९ रुपयांना दिला जात आहे. तसेच जर का तुम्ही ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डवरून खरेदी केली तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळणार आहे. याशिवाय तुम्ही Amazon पे क्रेडिट कार्डवरून तुम्ही २,३३१ रुपयांचा कॅशबॅक देखील मिळवू शकता. यासह तुम्हाला Amazon पे वर ५,००० रुपयांचे रिवॉर्डस देखील मिळू शकतात.

हेही वाचा : AI मुळे नोकरी गमावण्यास सुरुवात! IBM चे ७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी होणार बेरोजगार, CEO म्हणाले, “येत्या काही…”

iPhone 14 खरेदी करताना तुम्हाला चांगली एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर २०,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. जर का संपूर्ण ऑफर्सचा तुम्हाला फायदा झाला तर तुम्हाला आयफोन १४ ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Story img Loader