ॲपल मॅकबूक एअरची (Apple Mac Book Air) भारतात प्रचंड क्रेझ आहे. कारण तो प्रीमियम लॅपटॉप आहे. तसेच, त्यात मजबूत फिचर्स देण्यात आले आहेत. जे युजर्सच्या गरजेनुसार डिझाइन केले गेले आहेत. आता लॅपटॉपवरील उपलब्ध ऑफर्समुळे हा लॅपटॉप खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. ॲपलकडून मॅकबूक एअर एम१ आणि इतर अनेक मॅकबूक मॉडेल्सना मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळाल्या आहेत. जे लोक स्वस्तात MacBook खरेदी करण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण ॲमेझॉन आणि क्रोमसारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म काही खास ऑफर घेऊन आल्या आहेत. जाणून घ्या या ऑफर्स विषयी…
१. १३ इंचाचा मॅकबूक एअर एम१ (MacBook Air M1) सध्या ॲमेझॉनवर ८०,९९० रुपयांच्या सवलतीच्या दरावर उपलब्ध आहे. हा लॅपटॉप ॲपल स्टोअर्सवर ९९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह विकला जात आहे. याचा अर्थ ग्राहकांना १८,९९० रुपयांची सूट मिळत आहे. ॲमेझॉन या मॅकबूकवर फ्लॅट डिस्काउंट देत आहे. ८जीबी रॅम (8GB RAM) आणि २५६जीबी एसएसडी (256GB SSD) स्टोरेज मॉडेलची किंमत आहे.
हेही वाचा…सर्वात स्वस्त POCO स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री! 50MP कॅमेरासह ‘फ्लिपकार्टवर’ करा खरेदी…
२. ग्राहकांना नवीन एम२ चिपसह मॅकबूक एअर विकत घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा ॲपल कंपनी खास ऑफर घेऊन आली आहे. क्रोम १,०४,९९० रुपये सवलतीच्या दरात १३.६ इंचाच्या डिस्प्लेसह मॅकबूक एअर एम२ (MacBook Air M2) ऑफर करत आहे. ॲपल स्टोअर्सवर याची किंमत एक मॅकबूक १,१४,९०० रुपये आहे. तसेच तुम्ही एचडीएफसी (HDFC) बँक क्रेडिटवर पैसे भरल्यास तुम्हाला ५,००० रुपयांची अतिरिक्त सूटदेखील मिळेल; ज्यामुळे या मॅकबूकची किंमत आणखीन कमी होईल.
३. ॲपलचे इमॅजिन स्टोअर प्रो मॉडेल्सवरही सूट देत आहे. १३ इंचाच्या डिस्प्लेसह मॅकबूक प्रो एम२ (Pro M2) मॉडेल २५६जीबीसह १,०९,३१२ रुपयांना विक्रीसाठी उपल्बध आहे; तर १४ इंचाच्या डिस्प्लेसह मॅकबूक प्रो एम३ १,५४,७०६ रुपयांना खरेदी करता येणार आहे. या प्रो व्हेरियंटच्या किमतींमध्ये बँक आणि इतर ऑफर्सचा समावेश आहे, ज्या इमॅजिन स्टोअरच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
(टीप : कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मॅकबूक मॉडेल्सच्या किमती तपासून घ्या.)