Discount on motorola Edge 30 Ultra : मोटोरोला स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोटोरोलाने ८ जीबी रॅम आणि फास्ट चार्जिंग असलेला मोटोरोला एज ३० अल्ट्रा हा फोन लाँच केला होता. फ्लिपकार्टवर या फोनवर १५ हजार रुपयांची सूट मिळत आहे.

फ्लिपकार्टने आपल्या संकेतस्थळावर मोटोरोलाशी संबंधित मोटो डे सेल सुरू केला आहे. हा सेल आज संपणार आहे. या सेलमध्ये मोटोरोलाच्या अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर मोटोरोला एज ३० अल्ट्राची (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम) लिस्टेड किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, २१ टक्क्यांच्या सूटनंतर हा फोन ५४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. ग्राहकाला या फोनवर १५ हजार रुपयांची सूट मिळत आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
amaltash movie
सरले सारे तरीही…

(जुन्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट, मीडिया नव्या फोनमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ‘हे’ करा)

फीचर

Motorola Edge 30 Ultra हा ड्युअल सीम फोन अँड्रॉइड १२ वर्जनवर चालतो. फोनमध्ये १४४ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच एफएचडी + पोओएलईडी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेला गोरीला ग्लास ५ ची सुरक्षा मिळते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ + जेन १ एसओसी प्रोसेसरसह ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. गुणवत्तापूर्ण छायाचित्र मिळण्यासाठी फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन मिळते, जे १६ पिक्सेल्सना एकत्र करून एक अल्ट्रा पिक्सेल तयार करते.

फोनमध्ये अल्ट्रा वाइड अँगल एफ/२.२ अपर्चर लेन्ससह ५० मेगापिक्सेलचा सॅमसंग सेन्सर मिळतो. फोटो काढण्यासाठी फोन क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करतो. दीर्घकाळ काम करण्यासाठी फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये १२५ वॉट टर्बो पावर वायर्ड चार्जिंग आणि ५० वॉटपर्यंत वायरलेस चार्जिंग आणि १० वॉट वारयरलेस पावर शेअरींगची सुविधा मिळते. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेच्याबाबतीत फोनला आय ५२ रेटिंग मिळालेले आहे.

Story img Loader