Poco phones discount flipkart : १६ डिसेंबरपासून Flipkart Big Saving Days सेल सुरू होणार आहे. सेलच्या अगोदर पोकोने आपल्या काही स्मार्टफोन्सवर मोठी सूट जाहीर केली आहे. ग्राहकांना बँक ऑफर देखील मिळणार आहे. एसबीआय कार्डवर ग्राहकांना २ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, तर कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डावर १ हजार रुपयांची सूट मिळू शकते. कोणत्या स्मार्टफोन्सवर बेस्ट डिल मिळत आहे, जाणून घेऊया.
१) पोको एफ४ ५जी
Poco F4 5G फोन डिस्काउंटसह २२ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम मिळते. किंमतीमध्ये बँक डिस्काउंटचा समावेश आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० ५जी एसओसी आणि ६.६७ इंच अमोलेड डिस्प्ले मिळेल.
(खुशखबर! ‘IPHONE’मध्ये 5G सुरू करणारा अपडेट जारी, ‘हे’ फोन्स करतील सपोर्ट)
२) पोको एक्स४ प्रो ५जी
Poco X4 Pro 5G डिस्काउंटसह १४ हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ एसओसी आणि ६.६७ इंच सुपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. फोनममध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत असून त्यात ६४ एमपीचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.
३) पोको एम४ ५ जी
Poco M4 5G हा फोन डिस्कउंटसह १० हजार २४९ रुपयांमध्ये उलब्ध आहे. यामध्ये सर्व ऑफर्सचा समावेश आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते. या स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच आयपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत असून त्यात ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.
(ओला, उबेर वापरताना होईल मोठी बचत! अचानक भाववाढ दिसल्यास करा ‘हे’ उपाय, प्रवासासाठी ठरेल फायदेशीर)
४) पोको सी ३१
Poco C31 ६ हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जिबी रोम मिळेल. यासह फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी ३५ एसओसी आणि ६.५३ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून ५००० एमएएचची बॅटरी मिळते.