Apple Foldable Iphone : फोल्डेबल तंत्रज्ञानाबाबत आधीच सॅमसंगने अ‍ॅपलला डिवचले होते. त्यानंतर अ‍ॅपल काय प्रतिक्रिया देईल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅपलइन्साइडरनुसार, अ‍ॅपल आयफोन फोल्ड २०२५ मध्ये लाँच होईल, अशी अपेक्षा आहे. अ‍ॅपल सॅमसंग गॅलक्सी झेड सारख्या डिजाईनवर काम करत असेल, असे टिप्सटर जॉन प्रोसर यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रोसरनुसार, अ‍ॅपल क्लॅमशेल डिजाईनसह एका फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे ज्याचे प्रोटोटाइप काही लिक्समधून समोर आले होते. अ‍ॅपल सध्या उपकरणाच्या हिंजवर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्याच्या टिकाऊपणाची चाचणी घेत आहे.

(तीन कोटी प्रवाशांचा डेटा विक्रीला ठेवल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले डेटा ब्रीच..)

क्लॅमशेल फोल्डेबल आयफोनमध्ये फोल्डेबल डिस्प्ले असेल. यात सॅमसंगद्वारे पुरवठा होत असलेला फोल्डींग ओएलईडी डिस्प्ले असेल. फोल्डेबल आयफोनचे दोन्ही व्हर्जन मिळणार नाही, असे मला सांगण्यात आले आहे. जसे सॅमसंगकडे गॅलक्सी झेड फोल्ड आणि गॅलक्सी झेड प्लिप आहे तसे नाही. फोनमध्ये केवळ क्लामशेल किंवा बुक स्टाइल फोल्डींग तंत्रज्ञान सुरुवातीला असेल, असे प्रोसर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात एका अहवालात, अ‍ॅपलच्या ठरलेल्या योजनेनुसार सर्व काही झाल्यास कंपनी पहिले फोल्डेबल उपकरण सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच करेल, असा दावा करण्यात आला होता. याचा अर्थ फोन पुढील वर्षी लाँचसाठी सज्ज होईल. असे खरेच होईल का? हे आता येणारा काळच सांगेल.