जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनसच्या किमतीत वाढ केल्यानंतर इतरही कंपन्यांनी प्रीपेड रिचार्ज प्लॅनसच्या किमतीत वाढ केली होती. एअरटेल कंपनीचे ग्राहक या प्रकरणातून सावरले नसतानाही , अचानक कंपनीने आपल्या ग्राहकांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने बहुतेक प्रीपेड प्लॅनसमध्ये मिळणाऱ्या अमेझॉन प्राईम व्हीडिओ मोबाईल एडिशन सुविधा गुपचूपपणे काढून टाकली आहे. कंपनीने २०२१ मध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्स अंतर्गत हा फायदा जोडला होता. ज्याद्वारे ग्राहक चित्रपट, वेब सीरीज आणि टीव्ही शो पाहू शकत होते. यापुढे ही सुविधेचा फायदा कोणत्या प्लॅनमध्ये मिळणार नाही हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ प्लॅन्समध्ये मिळेल सुविधेचा फायदा

एअरटेल कंपनीने अमेझॉन प्राईम व्हीडिओ मोबाईल एडिशनची सुविधा काढून टाकल्यानंतर आता फक्त दोन एअरटेल प्रीपेड रिचार्जमध्ये या सुविधेचे मोफत ट्रायल दिले जाणार आहे. ज्यामध्ये रुपये ३५९ आणि १०८ रिचार्जचा समावेश आहे. या प्लॅन्सशिवाय, इतर सर्व प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला हा फायदा काढून टाकण्यात आला आहे.

रिचार्ज महाग होऊ शकतो ?

अलीकडील माहितीनुसार यावर्षी एअरटेल, जिओ आणि वोडाफोन सारख्या खाजगी कंपन्या त्यांच्या रिचार्ज योजनांमध्ये १० ते १२ टक्के वाढ करू शकतात. असे झाल्यास, ज्या रिचार्ज प्लॅनसाठी आज ग्राहकांकडून १०० रुपये घेतले जात आहेत, ते महाग झाल्यानंतर त्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत ११० ते ११२ रुपये होऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big shock to airtel users after jio now this benefit will not be available on recharge plan gps