Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे. जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. भारतीय बाजारासाठी Amazon प्राइम डे सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल केवळ ४८ तास म्हणजे दोन दिवसांसाठी असणार आहे. या सेलमध्ये असणाऱ्या ऑफर्स या केवळ प्राईम मेंबर्ससाठीच उपलब्ध असणार आहेत. विक्रीदरम्यान अनेक किंमतीमधील स्मार्टफोन उपलब्ध असणार असून त्यावर डिस्काउंट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. हा डिस्काउंट केवळ भारतात मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडे टेकशी बोलताना, Amazon इंडियाचे वायरलेस आणि होम एंटरटेनमेंट सेगमेंटचे डायरेक्टर रणजित बाबू म्हणाले, प्राईम डे सेलदरम्यान iPhone 14 वर मोठा डिस्काउंट मिळणार आहे.

हेही वाचा : Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखा जाहीर; ‘या’ २५ शहरांमध्ये मिळणार…, जाणून घ्या

प्राईम डे सेलमध्ये आयफोन १४ वर एक चांगली ऑफर असेल असा खुलासा त्यांनी केला. खरं तर, आयफोन १४ वरील ऑफर आयफोन १३ पेक्षा खूपच चांगली असेल. कंपनीने ऑफरची किंमत अद्याप उघड केलेली नाही. मात्र नमूद केल्याप्रमाणे आयफोन १४ वरील सेलमधील डिस्काउंट या वर्षातील सर्वात चांगली डिस्काउंट ऑफर असेल. यामध्ये काही चांगल्या एक्सचेंज ऑफर्स असतील त्यामुळे हे डील अधिक आकर्षक होईल.

आयफोन १३ तुलनेने जुना असल्याने आयफोन १४ वरच डिस्काउंट ऑफर देणे चांगले ठरेल. दरम्यान काही अफवांनुसार आयफोन १५ सिरीज या वर्षाच्या शेवटी लॉन्च होऊ शकते. यामध्ये कंपनी iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि शेवटी, iPhone 15 Plus यासह चार नवीन iPhone मॉडेल्सचे लॉन्चिंग करणे अपेक्षित आहे. मात्र याची सिरीजमधील मॉडेल्सची किंमत आयफोन १४ च्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. आयफोन 14 हे सध्या भारतात खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम iPhone मॉडेल आहे. अधिकृतपणे, भारतात मॉडेलची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते.

सेल इव्हेंटची घोषणा करताना कंपनीने असा दावा केला की, भारतातील ग्राहक सर्वात वेगवान डिलिव्हरीचा आनंद घेतील. भारतातील २५ शहरांमधून ऑर्डर करणारे प्राइम मेंबर्स त्याच दिवशी किंवा ऑर्डर केल्याच्या दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतील.” या २५ शहरांमध्ये हमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, फरिदाबाद, गांधी नगर, गुंटूर, गुडगाव, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नोएडा, पाटणा, पुणे, ठाणे, तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार डिस्काउंट, जाणून घ्या

तसेच कंपनीने खुलासा केला की आगामी Amazon प्राइम डे सेलमध्ये ICICI बँकचे कार्ड, SBIचे क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहार पेमेंटवर १० टक्के सूट मिळेल. प्राइम डे २०२३ साठी सर्व ग्राहकांना Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १० टक्क्यांची झटपट सूट मिळेल. या खरेदी फायद्यांव्यतिरिक्त हे कार्ड Amazon वर प्रवास बुकिंग, बिल पेमेंट आणि बरेच काही अमर्यादित लाभांसह येते. त्याशिवाय Amazon प्राईम डे सेलदरम्यान ज्या बजेट फोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे ज्यामध्ये सॅमसंग Galaxy M14, iQOO Z6 Lite, रिअलमी Narzo N53, रेडमी 12C आणि Tecno Spark 9 यांचा समावेश आहे. हे सर्व स्मार्टफोन्स अ‍ॅमेझॉनच्या प्राईम डे च्या पेजवर आहेत. ज्यांची किंमत सध्या १५ हजार रुपयांच्या खाली आहे. 

Amazon प्राईम डे सेल पेजवरवरून अशी माहिती मिळते की, वनप्लस नॉर्ड सीई ३ लाईट ५जी , वनप्लस ११ आर ५जी, आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस आणि अन्य स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे. मात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सर्व मॉडेल्सवरील डिस्काउंट ऑफर्स आणि त्यानंतर त्याच्या किंमती किती होणार हे अद्याप उघड करणे बाकी आहे. मात्र Amazon प्राईम डे सेलमध्ये ICICI बँक कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहाराद्वारे पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest discount on iphone 14 in amazon prime day sale 15 and 16 july check details and offers tmb 01
Show comments