Bill Gates Technology Predictions : २०२२ मध्ये ओपनएआयने(OpenAI) चॅटजीपीटी ( ChatGPT) लाँच केल्यापासून, कृत्रिम बुद्धिमत्तेने आपली विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. बहुतेक वेळा, जेमिनी(Gemini), कोपायलट(Copilot), डीपसीक (DeepSeek) आणि इतर AI चॅटबॉट्स (AI chatbots)अजूनही कामासाठी साधन म्हणून वापरले जात आहेत. पण एआयचा वाढता वापर पाहता AI वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नोकऱ्यांची जागा आता एआय घेऊ शकते अशी चिंता अनेकांना वाटत आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनीही आपले मत मांडले आहे.

गेल्या महिन्यात बिल गेट्स यांनी असाच अंदाज वर्तवला की, बहुतेक गोष्टींसाठी एआय माणसांची जागा घेईल आणि आता जगभरातील संस्था या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत, त्यामुळे अब्जाधीशांनी येत्या काळात भविष्यासाठी काय उपयुक्त ठरेल याबद्दल अधिक माहिती दिली.

‘या’ तीन नोकऱ्यांची जागा AI घेऊ शकणार नाही : बिल गेट्स (AI will not be able to replace ‘these’ three jobs: Bill Gates)

कोडर्स (Coders)

एनव्हीआयडीएचे जेन्सेन हुआंग, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ यांच्यासह अनेक अहवाल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते विचार करतात कीवाटते की, “नजीकच्या भविष्यात कोडर्सना (coders) पहिल्यांदा नोकरी गमवावी लागेल कारण एआय कोणतीही चूक न करता कोडींग करू शकते. परंतु याबाबत गेट्स यांचे मत वेगळे आहे; त्यांना वाटते की,” कोडिंगच्या या प्रक्रियेत माणसांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे एआय त्यांची जागा घेऊ शकणार नाही”

शास्त्रज्ञ (Biologists)

६९ वर्षीय गेट्स यांनी असेही म्हटले आहे की,”एआय जीव शास्त्रज्ञांची(biologists) जागा घेऊ शकणार नाही,कारण या कामात एआय वैज्ञानिक शोधांसाठी सर्जनशीलता दाखवू शकणार नाही. परंतु एआय तंत्रज्ञान हे रोग निदान( disease diagnosis, डीएनए विश्लेषण (DNA analysis ) यासारख्या गोष्टी करण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून काम करेल.

ऊर्जा तज्ज्ञ (Energy Experts)

गेट्स म्हणाले की,”एआय ऊर्जा तज्ज्ञांची( energy experts ) जागा घेणार नाही कारण हे क्षेत्र अजूनही पूर्णपणे स्वयंचलित होण्यासाठी खूप गुंतागुंतीचे आहे.

दिवसेंदिवस जनरेटिव्ह एआय ( generative AI) अधिक शक्तिशाली होत असताना, अनेक नेत्यांनी या वस्तुस्थितीबाबत सांगतात की. “तंत्रज्ञानाचा आपण कसे काम करतो यावर मोठा प्रभाव पडेल, काही क्षेत्रांमध्ये एआय मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकत आहे.”