Bill Gates introduces VectorCam technology : जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची चर्चा होते तेव्हा बिल गेट्स यांचे नाव आवर्जून घेतले जाते. जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स (Bill Gates) हे सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असतात. तर ते काही दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाउंटवर मलेरिया आजारासंबंधित नवनवीन व्हिडीओ शेअर करीत आहेत. आज त्यांनी चक्क उंच इमारतीवरून एक भलामोठा डास सोडला आहे. असं करण्यामागचे नेमकं कारण काय?
सोशल मीडियावर बिल गेट्स (Bill Gates) यांच्या @thisisbillgates या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बिल गेट्स यांनी एक मोठा मच्छर बनवून उंच इमारतीतून फेकला आहे . डासांबरोबर त्यांनी एक बॉल, किडादेखील फेकला. बिल गेट्स म्हणाले भलामोठा डास फेकताना म्हणाले की, मलेरिया विरुद्धच्या लढाईत संगणक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वपूर्ण आहे. कारण डासांपासून होणारे रोग दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. तर हे बघता गेट्स फाऊंडेशन, युगांडाच्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाच्या पाठिंब्याने बिल गेट्स यांनी डॉक्टर सौम्या आचार्य आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील त्यांच्या टीमने एक ॲप सादर केला आहे, ज्याचे नाव वेक्टरकॅम (VectorCam) ॲप असे आहे. “जर आपण मलेरिया, पोलिओसारख्या आजारांचा नायनाट केला तर मी ते एक मोठे यश मानेन,” असे बिल गेट्स व्हिडीओ शेअर करत म्हणाले आहेत.
हेही वाचा…सेकंड हॅण्ड iPhone घेण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी एकदा नक्की बघा; नाही तर होईल नुकसान
व्हिडीओ नक्की बघा…
वेक्टरकॅम तंत्रज्ञान केलं सादर :
बिल गेट्स (Bill Gates) यांनी वेक्टरकॅम तंत्रज्ञान सादर केले आहे. वेक्टरकॅम ॲप मलेरिया प्रसारित करणाऱ्या विविध प्रजातींमधला फरक तर डासांचे लिंग ओळखून ते कीटक मादी आहे का हे सुद्धा ओळखण्यास मदत करू शकते.
डासांच्या प्रजाती ओळखणे महत्त्वाचे का असते ?
रोग नियंत्रणासाठी डासांच्या प्रजाती समजून घेणे महत्त्वाचे आहे. डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींपासून वेगवेगळे रोग होतात. उदाहरणार्थ, मलेरियाचा प्रसार केवळ ॲनोफिलीस डासांमुळे होतो. हे कीटक काही घरांमध्ये चावतात तर काही घराबाहेर. काही संध्याकाळी तर काही दिवसा; तर काही कीटकांना फक्त अंडी घालण्यासाठी रक्ताची गरज असते. तर या ॲपच्या, संगणकाच्या मदतीने जलद आणि अचूकपणे डासांचा प्रजातींची ओळख करून दिली जाते. त्यामुळे या डासांपासून होणारे आजारांपासून इतरांचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते . तसेच “HumBug”चे हे एक ॲप जे डासांच्या प्रजातींना त्यांच्या पंखांच्या ठोक्यांच्या आवाजाद्वारे ओळखते, स्मार्टफोनमध्ये मायक्रोफोनद्वारे कॅप्चर केले जाते; असे बिल गेट्स (Bill Gates ) म्हणाले आहेत.