एलॉन मस्क यांनी गेल्यावर्षी ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले. तसेच अब्जाधीश मस्क हे खूप काळापासून सुपर अ‍ॅप असलेल्या ‘X’ अ‍ॅपबद्दल बोलत आहेत. जे लोकांना त्यांचे विचार जगाबरोबर शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासह अन्य काही करू शकेल. मस्क यांनी अनेकवेळा X अ‍ॅपसाठी आपल्या व्हिजनवर चर्चा केली आहे. जे लोकांना एकत्रित आणू शकते. पेमेंट करण्यासाठी मदत करू शकते. तसेच ऑनलाईन फूड ऑर्डर करू शकते. आणि यावर्षी एप्रिलमध्ये ट्विटर कायदेशीररित्या X अ‍ॅपमध्ये मर्ज झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ट्विटर कायदेशीररित्या X कॉर्प म्हणून ओळखले जात होते.

ट्विटरला X अ‍ॅपमध्ये रीब्रँड केले जात असल्याच्या बातम्या इंटरनेटवर येत आहेत. तथापि हा बदल लवकर होईल असा अंदाज कोणालाही नव्हता. मस्क हे ट्विटरला X अ‍ॅपच्या रूपात लोकांच्या अंदाजापेक्षाही लवकरच रीब्रँड करणार आहेत. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, आपण सर्वजण लवकरच ट्विटरला ब्रँड म्हणून निरोप देऊ. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Gautam Gambhir abused my family Manoj Tiwary allegations on Gautam Gambhir
Manoj Tiwary : ‘त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली अन्…’, मनोज तिवारीने पुन्हा एकदा साधला गौतम गंभीरला केलं लक्ष्य
Image of L&T Chairman And Logo
“काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज”, अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर L&T चे स्पष्टीकरण
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

हेही वाचा : Tech Tips: परदेशात प्रवास करताना UPI पेमेंट कसे करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

एलॉन मस्क यांची Twitter रीब्रँड करण्याची योजना

आपल्या योजनेबद्दल आणखी कोणतीही माहिती न देता तसेच टाइमलाइन स्पष्ट न करता मस्क यांनी ट्वीट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, ”आणि आम्ही लवकरच ट्विटर ब्रँड आणि हळू हळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ.”

ट्विटर बंद होत आहे का? असा मस्क यांच्या ट्वीटचा अर्थ होतो का ? तर नाही. ते बंद होणार नाही आहे. मस्क फक्त प्लॅटफॉर्मला रीब्रँड करण्याबाबत बोलत आहेत. तुम्ही अजूनही हे प्लॅटफॉर्म वापरण्यास सक्षम असाल फक्त यापुढे त्याला ट्विटर म्हटले जाणार नाही.

मस्क यांनी असे ट्वीट करताच त्यावर वापरकर्त्यांची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांना अपेक्षा आहे की मस्क हे X सह ‘नवीन सुरुवात’ करतील. तर अद्याप अन्य वापरकर्ते त्यांच्या आवडत्या निळ्या पक्ष्याचा (Blue Bird ) निरोप घेण्यास तयार नाहीत. मस्क यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये नमूद केले, जर का त्यांना ट्विटरला रीब्रँड करण्यासाठी एक चांगला लोगो मिळाला तर पुढील काही तासांमध्ये तो लाइव्ह होईल. ट्विटरच्या प्रमुखांनी अद्याप डोमेनबद्दल काही भाष्य केलेले नाही. तसेच Twitter.com अस्तित्वात राहील की नाही हेही सांगितले नाही. तथापि, डोमेन खूप मौल्यवान असते. यामध्ये टीमला वेगळ्या डोमेनवर जाण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे रीब्रँडिंग डोमेन शिफ्टपेक्षा खूप लवकर होऊ शकते.

Story img Loader