सध्या सोशल मीडियावर ब्लॅक फ्रायडे सेलची तुफान चर्चा आहे. तुमच्या फोन किंवा लॅपटॉप स्क्रीनवर ब्लॅक फ्रायडे सेलच्या नोटिफिकेशन सतत तुम्हाला दिसत असतील. ख्रिसमसच्या एक महिना आधी चालणाऱ्या या सेलमुळे तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळू शकतात. या सेलमध्ये सर्व प्रोडक्ट्सवर सवलतींसह खूप चांगल्या ऑफर्स उपलब्ध आहेत. तर आता मोबाइल, लॅपटॉप व्यतिरिक्त काही ॲक्सेसरीजवर म्हणजेच लिपस्टिक, बॅग, बॉडी क्रीम आदी वस्तूंवरदेखील या ऑफर सुरू आहेत.
खाली नमूद केलेल्या हटके ऑफर तुम्हाला बचत करण्यात नक्कीच मदत करतील. काय आहेत ऑफर चला पाहूयात…
१. डायसन (Dyson) :
डायसन (Dyson) मध्ये ॲक्सेसरीजवर ३,००० सूट आहे. बँक डिस्काउंट प्लस ८,००० रुपयांची व्याजावर बचत आणि विना खर्च ईएमआयसुद्धा मिळणार आहे. या ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त इथून खरेदी करून १७,००० रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकता. डायसन इन आणि डायसन डेमो स्टोअरमध्ये तुम्हाला अतिरिक्त १० टक्के इन्स्टंट बँक ऑफरसुद्धा मिळेल.
२. अप्पारेल ग्रुप (Apparel Group )
१. एएलडीओ (ALDO) :
ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त एएलडीओवर (ALDO) २६ नोव्हेंबरपर्यंत ऑफर असणार आहे. तसेच इथे तुम्हाला शूजवर ५० टक्के सवलतीच्या दारात वस्तू मिळतील. तसेच या वस्तू आणि ऑफर तुम्हाला वेबसाईट किंवा दुकानामध्येसुद्धा उपलब्ध असतील.
२. बाथ अँड बॉडी क्रीम (Bath And Body Works) :
अंघोळीसाठी बॉडी क्रीम, बॉडी वॉश यांचा उपयोग अनेकदा महिला वर्गाकडून करण्यात येतो. ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त तुम्हाला या वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री मिळणार आहेत. तसेच ही ऑफर उद्यापर्यंत मर्यादित असेल. या वस्तू आणि ऑफर तुम्हाला वेबसाईट आणि दुकानातसुद्धा उपलब्ध असतील.
३. चार्ल्स आणि कीथ (charles and keith) :
ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त काही निवडक बॅग्सवर आणि वस्तूंवर तुम्हाला ४० टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे. ही ऑफर २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या वस्तू आणि ऑफर तुम्हाला वेबसाईट किंवा दुकानामध्येसुद्धा उपलब्ध असतील.
४. इंग्लॉट (Inglot) :
ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त इंग्लॉटर कंपनीच्या लिपस्टिकवर तुम्हाला ३० टक्क्य़ांपर्यंत सवलत मिळणार आहे. ही ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आणि या वस्तू फक्त दुकानात उपलब्ध असतील.
५. आर अँड बी (R & B ) :
आर अँड बीच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. ही ऑफर २६ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तसेच या वस्तूंवरील ऑफर तुम्हाला वेबसाईट आणि दुकानातदेखील उपलब्ध असतील.
६. बेव्हरली हिल्स पोलो क्लब (Beverly hills polo club) :
ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त तुम्हाला कपड्यांवर ५० टक्के सवलत आहे. ही ऑफर २६ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तसेच या वस्तूंवरील ऑफर तुमच्यासाठी बेव्हरली हिल्स पोलो क्लब दुकानात उपलब्ध असतील. कपड्यांपासून ते ॲक्सेसरीजपर्यंत या कंपन्यांनी ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त स्वस्तात मस्त ऑफर्स दिल्या आहेत.