Samsung Offering Black Friday Sale : सॅमसंग, भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. पण, आज कंपनीने त्यांच्या नवीन गॅलेक्सी वेअरेबल्स लाइन-अपवर आकर्षक ऑफरची घोषणा केली. ‘ब्लॅक फ्रायडे सेल्स’ ऑफरचा एक भाग म्हणून, सॅमसंग गॅलेक्सी वॉच 7, गॅलेक्सी बड्स 3 आणि गॅलेक्सी बड्स FE वर सूट देत आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रा (Galaxy Watch Ultra) १२ हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध होईल. गॅलेक्सी वॉच अल्ट्रावर १२ हजार रुपयांचा झटपट कॅशबॅक, १० हजार रुपयांचा अपग्रेड बोनस; तर गॅलेक्सी बड्स ३ प्रो (Galaxy Buds3 Pro) वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पाच हजार रुपये कॅश बॅक किंवा अपग्रेड बोनस दिला जाईल. याशिवाय ग्राहक २४ महिन्यांपर्यंत विनाखर्च ईएमआयचा लाभ घेऊ शकतात. तसेच नवीन गॅलेक्सी एस आणि झेड मालिका स्मार्टफोन खरेदी करू पाहणारे ग्राहक सॅमसंगच्या नवीन वेअरेबलवर १८ हजारपर्यंतच्या मल्टी-बाय ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा (Galaxy Watch Ultra) :

Madhuri Dixit Ajay Jadeja love story
माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
zombie spider fungus last of us
शरीरात शिरून मांस खाणारा ‘झोंबी फंगस’ काय आहे? नवीन अभ्यासात संशोधकांना काय आढळले?
maharashtra assembly election quiz
Election Quiz: महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींचा अभ्यास आहे? या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका स्मार्टफोन
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

गॅलेक्सी वॉच पोर्टफोलिओमधील सगळ्यात नवीन गॅलेक्सी वॉच अल्ट्रा १० स्पोर्ट्स आणि फिटनेसप्रेमींसाठी डिझाइन केले आहे. टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि सॅफायर ग्लास डिस्प्ले (Titanium Grade 4 frame and sapphire glass display), एटीएम वॉटर रेझिस्टन्स, वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी आयपी ६८ रेटिंग, तसेच MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड प्रमाणपत्रही त्याला देण्यात आलं आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोडमध्ये १०० तासांपर्यंत रनटाइमसुद्धा ऑफर करतो.

हेही वाचा…Instagram New Features: इन्स्टाग्रामचे हे तीन नवीन फीचर्स ट्राय केलेत का? मित्र-मैत्रिणींची ठेवू शकता टोपणनावे; पण कसं?

गॅलेक्सी वॉच अल्ट्रा युजर्सना सॅमसंगच्या नवीन बायोॲक्टिव्ह सेन्सरचा वापर करून त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. ईसीजी रेकॉर्डिंग, एचआर अलर्ट फंक्शन जे हाय किंवा लो हृदय गती तपासतो. सॅमसंगने अलीकडेच गॅलेक्सी वॉचसाठी सॅमसंग हेल्थ मॉनिटर ॲपवर हार्ट रिदम नोटिफिकेशन (IHRN) फीचर आणले आहे. हे फीचर ब्लड प्रेशर आणि इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) मॉनिटरिंगसह एकत्रितपणे, IHRN फीचर ॲट्रिअल फायब्रिलेशन (AFib) हार्ट रिदम्‍सचे निदान करते, ज्‍यामुळे युजर्सना हृदयाच्या आरोग्यावर निरीक्षण करण्यास मदत होते.

गॅलॅक्सी बड्स ३ प्रो (Galaxy Buds3 Pro) :

गॅलेक्सी बड्स ३ प्रोमध्ये हाय-फाय ध्वनी गुणवत्ता ऑफर करण्यात आली आहे. गॅलेक्सी बड्स नवीन ब्लेड डिझाइनसह येते, जे दिवसभर आरामात वापरू शकता आणि स्टुडिओ-क्वालिटी साउंड ऑडिओचा आनंद घेऊ शकता. गॅलेक्सी बड्स ३ प्रो (Galaxy Buds3 Pro) 2 वे स्पीकर, प्लॅनर ट्विटर फॉर सोफिस्टिकेटेड, प्रेसिसे हाय रेंज साउंड आणि ड्युअल ॲम्प्लिफायर्ससह दिला जाणार आहे.

Galaxy Buds3 Pro युजर्सना गॅलेक्सी एआयसह गॅलेक्सी स्मार्टफोनशी कनेक्ट केलेले असताना रिअल-टाइम भाषांतर ऐकण्यास परवानगी देते. गॅलेक्सी बड्स ३ प्रो, ॲडॅप्टिव्ह ईक्यू आणि ॲडॅप्टिव्ह एएनसी फीचर्स आहेत, जी परिस्थती आणि वातावरणावर आधारित आवाज समायोजित करतात. व्हॉइस कॅन्सलेशनसह विविध प्रकारच्या बाहेरचा आवाज, जसे की बांधकाम आवाज, सायरन किंवा युजर्सच्या संभाषणांशी हुशारीने जुळवून घेतात.