आज जगभरात दीडशे कोटींहून अधिक लोक ईमेल पाठवण्यासाठी जीमेलचा वापर करतात. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक ईमेल पाठवण्यासाठी लोकांनी जीमेललाच प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. यासोबतच जीमेलवर हॅकर्सही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. हे हॅकर्स स्पॅम ईमेल आणि फिशिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून जीमेलचा डेटा हॅक करतात. यासाठी फॉलो करा पुढील ट्रिक्स.
ईमेलला अनसबस्क्राइब करा
तुम्ही तुमच्या वापरात नसलेल्या किंवा तुम्हाला उपयोगी नसलेल्या ईमेलला अनसबस्क्राइब करू शकता. हे तुम्हाला निरुपयोगी आणि अवास्तव ईमेल प्राप्त करण्यापासून थांबवेल. ईमेलचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, स्पॅम ईमेल निवडा आणि त्यानंतर तुम्हाला डिलीटच्या बाजूला एक पर्याय मिळेल, तो म्हणजे रिपोर्ट स्पॅम आणि अनसबस्क्राइब, तुम्ही हा पर्याय निवडा. याचा परिणाम म्हणजेच या आयडीवरून तुमच्या खात्यावर ईमेल येणे बंद होईल.
(हे ही वाचा : लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्वच्छ करताना ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या; नाहीतर होऊ शकतं लाखोंचं नुकसान)
स्पॅम ईमेलसाठी फिल्टरचा वापर करा
जीमेल मध्ये एक फिल्टर पर्याय देखील आहे जो तुम्ही स्पॅम ईमेल शोधण्यासाठी आणि ईमेल काढण्यासाठी वापरू शकता. हा पर्याय वापरण्यासाठी, तुम्हाला जीमेलच्या सर्च बॉक्समध्ये जावे लागेल आणि अनसबस्क्राइब टाइप करावे लागेल. हे सुनिश्चित करेल की, सर्व सदस्यत्व रद्द आणि स्पॅम ईमेल स्क्रीनवर दिसतील. आता येथे सर्व ईमेल निवडल्यानंतर, More वर क्लिक करा आणि या पर्यायाप्रमाणे फिल्टर संदेश निवडा. येथे तुम्हाला ईमेल डिलीट करण्याचा पर्यायही मिळेल.
दोन ईमेल खाती वापरा
दोन ईमेल खाती वापरणे हा हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुमचा पहिला ईमेल आयडी अधिकृत कामासाठी, स्मार्टफोन आणि बँका इत्यादींसाठी वापरा, तर दुसरा ईमेल आयडी संकेतस्थळाला भेट देणे, ऑनलाइन खरेदी करणे किंवा तिकीट बुक करणे यासारख्या क्रियाकलापांसाठी वापरा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पहिल्या ईमेल आयडीवर येणारे स्पॅम ई-मेल टाळू शकाल.