बीएमडब्ल्यू हा ब्रँड वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल बाजारात लाँच करत असते. यामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि उत्तम सुविधा या मध्ये मिळतात. यातच आता अशी एक बीएमडब्ल्यूमध्ये टेक्नॉलॉजी आली आहे की ती रंग बदलते. BMW AG हे मॉडेल माणसासारखा बोलते आणि रंग बदलण्यासाठी आणि ड्रायव्हरच्या मूडशी जुळवून घेते. योसाठी E-ink टेक्नॉलॉजी वापरतो. थोडक्यात ही गाडी नक्की सरडा आहे की गाडी? कारण बीएमडब्ल्यूची ही गाडी मनासारखे बोलते पण आणि ड्रायव्हरच्या मूडनुसार मग सुद्धा बदलते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर्मन लक्झरी ऑटोमेकरची BMW i Vision Dee हे मॉडेल बुधवारी संध्याकाळी यूएस स्प्लॅशी किकऑफमध्ये दिसले. वॉशिंग्टनमधील CES कॉन्फरन्समध्ये मुख्य कार्यकारी ऑलिव्हर झिपसे यांनी सांगितले की , २०२५ मध्ये याचे उत्पादन केले जाणार आहे. BMW एक नवीन लाइन-अप लाँच करण्याची योजना आखत आहे. बीएमडब्ल्यू ही संकल्पना एक शो कार अशी होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे हे आव्हानच असू शकते.

हेही वाचा : Maruti Nexa Black Edition भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या फीचर्स

या संकल्पनेत सर्वात मोठे फिचर म्हणजे या गाडीला डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये स्क्रीन नसेल. त्याऐवजी गाडीत एक डिजिटल स्लाईडर आहे. हा दृष्टिकोन BMW च्या बहुतेक लक्झरी सेगमेंट स्पर्धकांशी विरोधाभासी आहे, ज्याची सुरुवात इलेक्ट्रिक व्हेईकल पेस-सेटर टेस्ला इंक पासून झाली आहे.

हेही वाचा : CES 2023: सोनी कंपनीची ‘Afeela’ इलेक्ट्रिक कार २०२६ मध्ये लाँच होणार

अभिनेता आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्या प्रेझेंटेशनद्वारे हायलाइट केलेल्या सादरीकरणादरम्यान, BMW ने “Dee” या डिजिटल सहाय्यकाला देखील मध्यवर्ती भूमिका दिली ज्याने महिला आवाजात जिपसे आणि इतरांशी संवाद साधला. i Vision Dee कारमध्ये 240 स्वतंत्र कलर सेल आहेत जे वैयक्तिकरित्या बदलू शकतात. एका क्षणात, ही गाडी एक हलका हिरवा रंग निर्माण करते तर लगेच नंतर गडद जांभळा. लगेच त्याचा रंग पांढर्‍या रेसिंग पट्ट्यांसह लाल होतो. ड्रायव्हयरच्या मूड प्रमाणे रंग बदलतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw ag car teases talking car shifts various colours in chameleon mood of driver tmb 01