भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच फ्रान्स देशाचा दौरा केला. त्यामध्ये boAt चे संस्थापक अमन गुप्ता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारसह फ्रान्सच्या एका महत्वपूर्ण दौऱ्यामध्ये जाण्याची संधी मिळाली. ही विलक्षण संधी अमन गुप्ता यांसारख्या नवीन उद्योजकांसाठी महत्वाची गोष्ट होती. कारण त्यांना व्यावसायिक नेत्यांसह फ्रान्सच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
मिळालेल्या या विलक्षण संधीबद्दल आपला आनंद व्यक्त करताना अमन गुप्ता सोशल मीडियावर म्हणाले, ”मी पंतप्रधानांसह अधिकृत शिष्टमंडळाच्या रूपात दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील उद्योजकांना दौऱ्यावर जाताना पाहायचो. पण आता माझ्यासारख्या नवीन उद्योजकांनाही अशा भेटींसाठी आमंत्रित केले जात आहे. हा आमच्यासाठी एक महत्वाचा क्षण आहे. कारण तो भारतातील उद्योजकतेच्या भावनेला मिळालेली मान्यता आणि पाठिंबा दर्शवतो.” याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
या दौऱ्यादरम्यान, गुप्ता यांना इंडो-फ्रेंच सीईओ फोरमला संबोधित करण्याची संधी देऊन सन्मानित करण्यात आले. जिथे त्यांनी ”मेक इन इंडिया” विषयी माहिती सांगितली. तसेच भारतीय स्टार्टअप्सच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन केले. या प्रतिष्ठित भेटीत त्यांच्या उपस्थितीने भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक दृढ झाले कारण त्यांनी फ्रान्सचे मंत्री, कार्पोरेट नेत्यांशी अर्थपूर्ण चर्चा केली.
आमच्या या फ्रान्स दौऱ्यामध्ये सर्वात आकर्षक गोष्ट होती ती म्हणजे भव्य अशी ‘बॅस्टिल डे परेड’, जी फ्रान्सचा राष्ट्रीय गौरव साजरा करणारा भव्य देखावा होता. या देखाव्या दरम्यान, भारतीय तुकडीने “सारे जहाँ से अच्छा” या देशभक्तीपर गीताच्या चित्तथरारक सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामुळे अमन गुप्ता यांचे हृदय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले.
या समृद्ध अशा अनुभवांनी गुप्ता यांच्या अढळ विश्वासाला अधिक मजबूत केले आहे की, भारत अशा युगामध्ये प्रवेश करत आहे जिथे भारत अभिमानाने उर्वरित जगाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.