सध्या स्मार्टवॉच घालणं जणू एक फॅशन झाली आहे. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या ब्रँडचे स्मार्टवॉच आपण पाहतो. अनेक कंपन्यादेखील विविध स्मार्टवॉच ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. तर आता बोट कंपनी आणखी एक नवीन स्मार्टवॉच बाजारात घेऊन आली आहे. आज आपण या स्मार्टवॉचची किंमत आणि फिचर जाणून घेऊ.

बोट कंपनीचे बोट एनिग्मा झेड२० (Boat Enigma Z20) स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. बोटचे नवीन स्मार्टवॉच १.५ इंचाच्या राउंड एचडी डिस्प्लेसह येते आणि पारंपरिक लक्झरी घड्याळ डिझाइन ऑफर करते. हे ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते. तसेच धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आयपी६८ (IP68) रेट केले आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टवॉच धातू वापरून तयार केले आहे. यात फंक्शनल क्राऊनदेखील आहे. तसेच या घड्याळाला तीन पट्ट्यांचा पर्यायदेखील उपल्बध आहे. घड्याळ फिटनेस ट्रॅकर्स आणि अनेक स्पोर्ट्स मोडसह परिपूर्ण येते.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा…नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओने ग्राहकांसाठी लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन; जाणून घ्या…

बोट एनिग्मा Z20 ची भारतात किंमत :

जर तुम्हाला स्मार्टवॉचमध्ये जेट ब्लॅक रबर पट्टा हवा असेल तर याची किंमत ३,२९९ रुपयांपासून सुरू होते. तसेच तुम्हाला मेटलचा (धातू) काळा पट्टा किंवा तपकिरी लेदरचा पट्टा घ्यायचा असेल. तर तुम्हाला ३,४९९ रुपये किमतीत हे स्मार्टवॉच मिळेल. स्मार्टवॉच अधिकृत स्टोअर तसेच Amazon India द्वारे ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

बोट एनिग्मा Z20 फिचर :

बोटचे नवीनतम स्मार्टवॉच राउंड डायल आणि टेन्साइल मेटल कन्स्ट्रक्शनसह येते. बोट एनिग्मा Z20 मध्ये १.५१ इंचाचा (1.51) एचडी एलसीडी ( HD LCD) राउंड डिस्प्ले आहे; जो ३६०x३६० रिझोल्यूशन आणि ६०० निटस (600 nits) पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट आहे. ब्लूटूथ ५.० (5.0) सह येते. तुम्हाला क्विक डायल पॅड, घड्याळावर २५० संपर्क सेव्ह करण्याची क्षमता आणि आपत्कालीन SOS आदी फिचर्स या स्मार्टवॉचमध्ये मिळणार आहेत. हेल्थ ट्रॅकिंगच्या बाबतीत, बोट एनिग्मा Z20 मध्ये हृदयाची गती मॉनिटर, एसपीओ२ (SpO2) आदी गोष्टी उपल्बध आहेत. बोट एनिग्मा Z20 स्मार्टवॉचसह, तुम्हाला व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आणि कॅमेरा कंट्रोल, फ्री बिल्ट-इन गेम्स, म्युझिक कंट्रोल, अलार्म, काउंटडाउन टाइमर, फाइंड माय फोन आणि अलर्ट यांसारखी इतर फिचर्सदेखील मिळतात.