बोट कंपनी बजेट फ्रेंडली, तसेच अनेक महागडे स्मार्टवॉचदेखील लाँच करीत असते. तसेच या स्मार्टवॉचना ग्राहकांचीही चांगली पसंती मिळत आहे. अशातच भारतातील टॉप ब्रॅण्ड बोट कंपनीने (boAt) तंत्रज्ञानाच्या जगात काहीतरी खास सादर केले आहे. बोट कंपनीने पहिले एलटीई स्मार्टवॉच मार्केटमध्ये आणले आहे; ज्याचे (boAt Lunar Pro LTE ) असे नाव आहे. ‘बोट’ने भारतातील प्रमुख दूरसंचार कंपनी ‘जिओ’ (Jio)बरोबर पार्टनरशिप केली आहे. तसेच या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन, लुनार प्रो एलटीई (Lunar Pro LTE) यास खास स्मार्टवॉचची घोषणा केली आहे; ज्यात जिओचे ई-सिम आहे.

आपापसांतील संपर्क सहज अन् सोपा करणे हे बोट लुनार प्रो एलटीई (boAt Lunar Pro LTE) स्मार्टवॉचचे उद्दिष्ट आहे. स्मार्टवॉचमध्ये असणाऱ्या ई-सिममुळे (eSIM) तुम्हाला तुमचा फोन सतत बरोबर ठेवण्याची गरज भासणार नाही. ई-सिममुळे फोन जवळ न ठेवताही तुम्ही इतरांशी कॉल, मेसेजद्वारे संपर्कात राहू शकता. जे लोक नेहमी प्रवासात असतात, त्यांच्यासाठी हे स्मार्टवॉच अत्यंत उपयुक्त आहे. कारण- तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी किंवा सिग्नल स्ट्रेंथबद्दल काळजी करण्याची गरज भासणार नाही. हे स्मार्टवॉच मोबाईलप्रमाणे काम करील, असा दावा बोट (boAt) कंपनीने केला आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

हेही वाचा…टाटा कंपनी उभारणार दुसरा आयफोन कारखाना! ‘एवढ्या’ कामगारांना मिळणार रोजगाराच्या संधी

बोट लुनार प्रो एलटीईची (Lunar Pro LTE) सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यातील जीपीएस (GPS). जर तुम्ही धावत किंवा सायकल चालवत असाल, तर हे स्मार्टवॉच तुमचा रस्ता अचूकपणे ट्रॅक करू शकते. तसेच तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, तुम्ही कोणता मार्ग निवडला आहे हेसुद्धा हे स्मार्टवॉच अचूकपणे दाखवू शकते. तसेच यात १.३९ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. त्यामुळे डिस्प्ले जास्त ऊन असतानासुद्धा पाहणे सोपे जाते. तसेच हे ई-सिम ४जी नेटवर्क वापरते.

तसेच या सगळ्या वैशिष्ट्यांबरोबरच लुनार वॉचमध्‍ये हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, स्लीप ट्रॅकर व फिटनेस ट्रॅकर यांसारखी साधनेदेखील आहेत. तसेच तुम्ही खूप वेळ एकाच ठिकाणी बसून असाल, तर हे स्मार्टवॉच तुम्हाला बाहेर फिरून येण्याची किंवा चालण्याचीसुद्धा आठवण करून देते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्य आणि फिटनेसच्या ध्येयांवर लक्ष ठेवण्यास मदत होते.