Boat Wave Ultima launch : इअरफोन्स आणि स्मार्टवॉचसाठी लोकप्रिय असलेल्या बोटने आपली एक नवीन स्मार्टवॉच ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. Boat Wave Ultima असे या स्मार्टवॉचचे नाव असून तिच्यात ब्ल्युटूथ कॉलिंग फीचर मिळते. घडाळीमध्ये एक मोठा कर्व्ह आर्क डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर, या घडाळीत आरोग्यासंबंधी काही फीचर्स उपलब्ध आहेत.
बजेट सेगमेंटमध्ये बोटच्या उपकरणांना मोठी मागणी आहे. ग्राहकांना परडवणाऱ्या किंमतीमध्ये स्मार्टवॉच, इअरबड्स या सारखी उपकरणे या कंपनीकडून मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत बोटच्या ३० स्मार्टवॉच ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये कर्व्ह डिस्प्लेसह मिळणारी बोट व्हेव अल्टिमा ही पहिली घडाळ आहे.
(एटीएम कार्ड विसरले? फोनद्वारे काढता येतात पैसे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
किंमत आणि फीचर्स
भारतात या घडाळीची किंमत २ हजार ९९९ रुपये असून ती बोटच्या अधिकृत संकेतस्थळ आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. घडळीत ५०० निट्स ब्राइटनेससह १.८ इंचचा कर्व्ह डिस्प्ले मिळतो. उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी तिच्यात ब्ल्युटूथ व्ही ५.३ देण्यात आले आहे. स्पष्ट आवाज ऐकू येण्यासाठी एचडी स्पिकर आणि हाय सेन्सिटिव्हिटी मायक्रोफोन देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये तुम्ही संपर्क क्रमांक देखील सेव्ह करू शकता.
दैनंदिन क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी घडाळीत अनेक सेन्सर्स आणि मॉनिटर्स देण्यात आले आहेत. ही घडाळ १०० पेक्षा अधिक स्पोर्ट मोड्सने सूसज्ज आहे. यामध्ये ऑटो वर्कआऊट डिटेक्शन, सक्रिय खेळ जसे चालणे, धावणे, पोहणे आणि योगासह अनेक मोड्सचा समावेश आहे. घड्याळ रेजिंग रेड, अक्टिव्ह ब्लॅक आणि टिल ग्रीन या तीन विविध स्ट्रॅप पर्यायांसह मिळते.
(वनप्लसच्या ‘या’ 2 स्मार्टफोनला मिळणार 5G सपोर्ट; कंपनीने जारी केला अपडेट)
ही स्मार्टवॉच तुमच्या हृदयाच्या गतीवर लक्ष ठेवते आणि तुमच्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचाही मागोवा घेते. घडाळीत स्ट्रेस मॉनिटरींग फीचर देण्यात आले आहे जे तुमच्या तणावाच्या पातळीचा मागोवा घेते आणि तुम्हाला तुमच्या समग्र आरोग्याचा तपशीलवार सारांश पाहू देते.
boAt Wave Ultima ला आयपी ६८ रेटिंग मिळाले आहे, जे धूळ, घाम आणि पाण्यापासून संरक्षणाची खात्री देते. घडाळ १० दिवसांपर्यंत चालू शकते आणि ब्ल्युटूथ कॉलिंगसह ती ३ दिवस चालते, असा दावा कंपनीने केला आहे.