मेटाने अधिकृतपणे Threads अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देते. मेटाच्या थ्रेड्सला खूप पसंती मिळत आहे. थ्रेडस अॅप एकाच दिवसामध्ये ५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. आता या यादीमध्ये एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, क्रिकेटर शिखर धवन आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरु यांच्यासह अनेक मंत्री आणि सेलिब्रेटींनी थ्रेड्स जॉईन केले आहे.
थ्रेड्सवर दोन दिवसांमध्ये ५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी साइन इन केले आहे. यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी थ्रेड्स जॉईन केले आहे. तसेच केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देखील थ्रेड्सवर आपले अकाउंट तयार केले आहे. तसेच थ्रेड्स जॉईन करण्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गिरीराज सिंह आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त business standard ने दिले आहे.
एलॉन मस्क यांच्या ट्विटरची स्पर्धा मेटाच्या थ्रेड्सशी होणार आहे. App लॉन्च झाल्यापासून २४ तासांमध्ये तब्बल ३ कोटी वापरकर्त्यांनी थ्रेड्स जॉईन केले आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या अधिकृत थ्रेड्स अकाउंटवर ही घोषणा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवीन मायक्रोब्लॉगिंग साईट थ्रेड्सवर जॉईन झाले आहेत.
अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले जॉईन
दिग्दर्शक करण जोहर, क्रिकेटपटू शिखर धवन, ऋषभ पंत आणि सुरेश रैना तसेच अभिनेत्री काजोल, माधुरी दीक्षित, तापसी पन्नू, तमन्ना भाटिया, मृणाल ठाकूर, सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा आणि अभिनेते अभिषेक बच्चन, अल्लू अर्जुन, जे.टी.आर. चिरंजीवी, महेश बाबू आणि अली फजल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी थ्रेडसवर आपले अकाउंट सुरू केले आहे. तसेच रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सचे अधिकृत अकाउंट यावर दिसून येत आहे. थ्रेडस जॉईन करणाऱ्यांमध्ये ध्यात्मिक गुरू सद्गुरु आणि गौर गोपाल दास यांचा देखील समावेश आहे.