गेल्या वर्षी OpenAI कंपनीने ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. अनेक ठिकाणी आता चॅटजीपीटीचा वापर केला जात आहे. आता याचा वापर आणखी एका ठिकाणी होणार आहे. लोकप्रिय ट्रॅव्हल बुकिंग कंपनी Booking.com आता त्यांच्या ट्रॅव्हल बुकिंग App मध्ये एक नवीन ‘ट्रिप प्लॅनर’ फिचर लॉन्च करणार आहे. असे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. हे नवीन फिचर ChatGpt च्या प्रगत भाषांद्वारे समर्थित या हे नवीन फिचर नवीन फीचरचे उद्दिष्ट हे निवडक वापरकर्त्यांना प्रश्न विचारण्याची आणि वैयक्तिक प्रवासाचे नियोजन करण्यासाठी मदत करून ग्राहकांचा प्रवासाचा अनुभव वाढवण्याचा आहे.

बुधवारपासून, वापरकर्ते ट्रिप प्लॅनर या फीचरचा वापर करू शकतील. जे जाण्याचे ठिकाणी आणि तिथे राहण्याची व्यवस्था प्रदान करण्यासाठी Booking.com चे सध्याचे मशीन लर्निंग मॉडेलसह चॅटजीपीटीच्या क्षमतांना एकत्रित करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मधील सुविधांचा फायदा घेऊन बुकिंग डॉट कॉम आपल्या ग्राहकांना अधिक चांगला प्रवासाचा पर्याय शोधण्यासाठी मदत करणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा : अनलिमिटेड कॉलिंग,४० जीबी बोनस डेटा आणि…; Reliance Jio च्या ८४ दिवसांच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळतात अनेक फायदे

Booking.com चे टेक्नॉलॉजी प्रमुख रॉब फ्रान्सिस यांनी AI ट्रिप प्लॅनरबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले, ”आमचे नवीन AI ट्रिप प्लॅनर आम्हाला आमच्या ग्राहकांना नियोजन करणे आणि प्रवासासाठी पर्याय शोधण्यात खरोखरच काही रोमांचक शक्यता प्रदान करते.” प्रवासाचे नियोजन करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे हे एकत्रीकरण कंपनीसाठी वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरू शकते.

OpenAI ने विकसित केलेले ChatGPT या ट्रिप प्लॅनर फीचरला अधिक शक्तिशाली करणारा चॅटबॉट म्हणून काम करते. संवादाचे अनुकरण, फॉलो-अप प्रश्न हाताळण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले ChatGpt हे त्रुटी स्वीकारू शकते, चुकीच्या गोष्टींना आव्हान देऊ शकते तसेच चुकीच्या विनंत्या नाकारू शकते. या जनरेटीव्ही AI टेक्नॉलॉजीने टेक उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ७ जुलैला लॉन्च होणार Samsung चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, काय असू शकतात फीचर्स

बुकिंग डॉट कॉम हे ट्रिप प्लॅनर हे फिचर लॉन्च करणार आहे. यामुळे अमेरिकेतील निवडक वापरकर्त्यांना प्रश्न विचारण्याची आणि वैयक्तिक प्रवासाचे नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. सुरुवातीला, ट्रिप प्लॅनरचे व्हर्जन हे अमेरिकेतील बुकिंग डॉट कॉमच्या लॉयल्टी प्रोग्रॅम “जीनियस” च्या निवडक सदस्यांसाठीच उपलब्ध असेल पुढील काही आठवड्यांमध्ये या सदस्यांना फीचरची चाचणी करण्याची आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची संधी मिळेल. ज्यामुळे बुकिंग डॉट कॉमला वापरकर्त्यांना प्रवासाचा अनुभव सुधारण्यास मदत होणार आहे.