बुक माय शो (BookMyShow) हे ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरुन वेगवेगळ्या सिनेमा, नाटकांचे तिकीट ऑनलाईन बुक करता येतात. यासह अनेक स्पोर्ट्स, म्युझिक इव्हेंटचे तिकीटही या माध्यामातून बुक करू शकतो. मात्र तुम्ही बुक केलेलं तिकीट यापूर्वी दुसऱ्याला ट्रान्सफर करण्याची परवानगी नव्हती. मात्र कंपनीने आता ग्राहकांना त्यांनी बुक केलेलं तिकीट दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करण्याची सेवा सुरु केली आहे. यामुळे बुक माय शोवर तुम्ही बुक केलेल्या तिकीटावर आता कोणीही नाटक, सिनेमा जाऊन पाहू शकणार आहात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी बुक माय शोवर एखाद्या सिनेमा किंवा नाटकाचं ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर केवळ आपल्या मोबाईलवरील कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांनाच मेसेज स्वरुपात तिकीट शेअर करण्याची परवानगी होती. यावेळी तिकीट पाठवलेल्या व्यक्तीला केवळ एक मेसेज जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून क्यूआर कोडवर आधारित तिकीट प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. क्यूआर कोडवर आधारित ऑनलाईन तिकीटमुळे आता आपण बुक केलेल्या तिकीटावर दुसरा व्यक्ती सहन जाऊन सिनेमा बघून येऊ शकतो.

बुक माय शो युजर्सला त्याच्या संपर्कातील लोकांना तिकीट पाठवण्याची परवानगी दिली जाते. यावेळी तुम्ही जर तिकीट बुक केलं असेल तर तुम्हाला आलेला क्यूआर कोड तुम्ही तुमच्या मित्राला पाठवला तर तो जाऊन बुक केलेला सिनेमा किंवा इव्हेंट पाहू शकेल.

तिकीट टान्सफर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ चार सोप्या स्टेप्स

१) सर्वप्रथम बुक माय शो अ‍ॅप ओपन करा.

२) आता तुम्हाला पाहिजे त्या सिनेमा, नाटक किंवा इव्हेंटचं तिकीट बुक करा.

४) बुकिंग डिटेल्स पाहण्यासाठी तिकीट कन्फर्मेशन विंडोवर क्लिक करा.

५) आता ट्रान्सफर तिकीटवर क्लिक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला हे तिकीट पाठवायचे त्याला सिलेक्ट करा.

तुम्ही कोणत्याही वेळी तुमची तिकीट ट्रान्सफर रिक्वेस्ट रद्द करू शकता.

आता ज्या व्यक्तीला तिकीट टान्सफर केलं त्या व्यक्तीला एक टेक्स मेसेज जाईल. या टेक्स मेसेजमध्ये आलेला युआरएल ओपन करून क्युआर कोडसह बुकिंग संदर्भातील सर्व माहिती त्या व्यक्तीकडे आलेली असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookmyshow how to transfer booked tickets sjr