भारतीय स्मार्ट वेअरेबल ब्रँड बोल्टने भारतात पहिले-वहिले साउंडबार लाँच केलं आहे. कंपनीने हा साउंडबार लाँच करून स्मार्ट होम उपकरणांमध्ये प्रवेश केला आहे. हा नवीन साउंडबार लाँच करून कंपनी ग्राहकांचा टीव्ही पाहण्याचा अनुभव आणखीन खास करणार आहे. पार्टी असो किंवा सोलो म्युझिक ऐकण्याचा आनंद घेणे असो, साउंडबार वापरकर्त्यांना एक खास ऑडिओ अनुभव प्रदान करेल. तर आज आपण या लेखातून नवीन साउंडबारची किंमत, फीचर्सबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

कंपनीने साउंडबार दोन प्रकारांमध्ये सादर केला आहे. एक म्हणजे Boult BassBox X120 आणि दुसरं म्हणजे BassBox X180 साउंडबार. एक्स १२० (X120) ची किंमत ४,९९९ रुपये, तर एक्स १८० (X180) ची किंमत ५,९९९ रुपये आहे. तुम्ही या साउंडबारची खरेदी अधिकृत वेबसाइट boultaudio.com आणि Flipkart वरून करू शकता.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Hundred more trained traffic servants assist to help traffic department to ease congestion on Ghodbunder road
घोडबंदर भागासाठी मिळणार आणखी शंभर वाहतूकसेवक, ठाणे महापालिका आयुक्तांचे बैठकीत संकेत
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका

हेही वाचा…विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय

बोल्ट BassBox X120 दोन साउंड ड्रायव्हर्स आणि 120 RMS च्या ऑडिओ आउटपूटने सुसज्ज आहे; ज्यामुळे ते लहान खोल्यांमध्ये ऑडिओ वाढवण्यासाठी योग्य बनतात. तसेच वापरकर्ते तीन EQ मोडसह ऑडिओ सेटिंग्जसुद्धा करू शकतात. चित्रपट, संगीत, बातम्या डिव्हाइस रिमोट किंवा त्याच्या नियंत्रण पॅनेलद्वारे कंट्रोल केल्या जाऊ शकतात. हे ऑडिओचा आवाज सुधारण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करतात.

दोन्ही मॉडेल्स 2.1 चॅनेल सेटअप देतात आणि त्यात ब्लूटूथ ५.३, एयूएक्स (AUX) , यूएसबी (USB), ऑप्टिकल आणि एचडीएमआय (HDMI) कनेक्टिव्हिटीसह परिपूर्ण आहे आणि स्मार्ट टीव्ही, संगणक, मोबाइल आणि गेमिंग कन्सोल यांसारख्या विविध उपकरणांशी कनेक्ट होऊ शकतो.

स्मार्ट होम ऑडिओ उद्योगात BOULT च्या प्रवेशाविषयी बोलताना, BOULT चे सह संस्थापक वरुण गुप्ता म्हणाले, “TWS विभागातील ग्राहकांकडून प्रचंड पाठिंबा आणि प्रेम मिळाल्यानंतर, आम्ही स्मार्ट होम ऑडिओ उद्योगात पदार्पण केलं आहे. BassBox लाँच आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आम्ही आमच्या प्रोडक्टच्या ऑफरचा विस्तार करून ऑडिओ गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे’, असे ते यावेळी म्हणाले. तर स्वस्तात मस्त बोटचा हा साउंडबार तुम्ही घरी आणू शकता.

Story img Loader