चोख सुरक्षा प्रणाली आणि गुणवत्तापूर्ण कॅमेऱ्यासाठी ओळख असलेल्या अ‍ॅप्पलचा आयफोन १४ आज लाँच होणार आहे. आयफोनचे फॅन्स आतुरतेने या फोनची वाट पाहात आहेत. मात्र, ब्राझीलमध्ये न्याय मंत्रालयाच्या निर्णयानंतर आयफोनच्या विक्रीला गालबोट लागले आहे. यामुळे ब्राझीलमधील आयफोनच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या लोकांना वेळेत आयफोन मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे प्रकार?

न्याय मंत्रालयाने अ‍ॅप्पलला २.३८ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे आणि आयफोन १२ सह इतर नवीन मॉडल्सची विक्री कॅन्सल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, जे आयफोन चार्जर शिवाय मिळतील त्यांची विक्री थांबवण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहे.

(Apple Event 2022: आज होणार iphone 14 लॉन्च; भारतात कुठे, कधी व कसा पाहाल लाईव्ह? जाणून घ्या)

देशाच्या अधिकृत राजपत्रात मंगळवारी प्रकाशित झालेल्या आदेशात, आयफोनकडून ग्राहकांशी भेदभाव होत असल्याचे म्हटले हे. कंपनीकडून फोनचा चार्जर दिला जात नसल्यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. तसेच, चार्जरसंबंधी अ‍ॅप्पलकडून मांडण्यात आलेला पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा खोडून काढण्यात आला आहे.

कार्बन इमिशन कमी होईल?

कार्बन इमिशन कमी होईल या कारणास्तव चार्जर देण्यात येत नाही, असा अ‍ॅप्पल कंपनीचा युक्तिवाद होता. मात्र, चार्जर शिवाय फोन दिल्याने पर्यावरण सुरक्षेला हातभार लागेल, हे स्पष्ट करणारा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगत मंत्रालयाने आयफोनला विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान समस्या सोडवण्यासाठी आपण ब्राझीलच्या सेनाकॉन या ब्राझिलियन ग्राहक संरक्षण एजन्सीसोबत काम करणार आहे. आणि या निर्णयाविरोधात आपण अपिल करणार असल्याचे अ‍ॅप्पल कंपनीने सांगितले.

(विश्लेषण : नवीन आयफोनला सॅटेलाइट जोडणी? अ‍ॅपलच्या कार्यक्रमात आज आयफोन १४ ची घोषणा)