काहीतरी महत्त्वाचं काम असतं आणि नेटवर्क नेमकं इतकं कासवाच्या गतीने चालू लागतं की काय करू हेच सुचत नाही.. अनेकदा तुम्ही सुद्धा हा त्रास अनुभवला असेलच, हो ना? अशात जर आपण आपल्या नेटवर्क पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क करायला जाता आणि तिथूनही ‘ एक- दोन दिवसात सुरु होईल, सर्व्हर डाऊन आहे’ अशी असमाधानकारक उत्तरं दिली जातात. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांची मात्र पूर्ण पंचाईत होते. मात्र या सर्व प्रश्नांवर एका ब्रॉडबँड कंपनीने मोठं आश्वासन दिलं आहे. इतकंच नव्हे तर जर का आम्ही दिलेला शब्द पाळला केली नाही तर संपूर्ण दिवस तुम्हाला फ्री मध्ये इंटरनेट वापरायला देऊ अशी गॅरंटी सुद्धा दिली आहे.
एक्साइटल ब्रॉडबैंड (Excitel Broadband) या कंपनीने आपल्या ग्राहकांना असे आश्वासन दिले आहे की, जर का तुम्हाला कंपनीच्या सेवा वापरताना अडचण येत असेल तर तुमच्या तक्रारीवर चार तासांच्या आत संधान पुरवले जाईल. जर का चार तासात तुम्हाला कंपनीकडून योग्य तो उपाय मिळाला नाही तर समस्या दूर झाल्यावर एक संपूर्ण दिवस मोफत इंटरनेट सेवा पुरवल्या जातील.
गणपतीला गावी जाऊन इंटरनेटची चिंता नको; ‘ही’ कंपनी देतेय 275 रुपयात 3300GB डेटा
दरम्यान कंपनीकडून या संदर्भात काही नियम व अटी सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत, जसे की, ग्राहकांना या सुविधेचा लाभ सकाळी ९ ते रात्री ९ याच वेळेत घेता येणार आहे. जर आपण सकाळी ९ च्या आधी किंवा रात्री ९ च्या नंतर तक्रार करत असाल तर आपल्या समस्येवर उपाय तर शोधण्यासाठी आपली मदत केली जाईल मात्र त्यावर चार तासांच्या अवधीचा नियम लागू राहणार नाही.
एक्साइटल कंपनी सध्या अनेक शहरांमध्ये नेटवर्कचा विस्तार करत आहे. आपल्या शहरातही जर का ही सेवा उपलब्ध असेल तर याचा लाभ घेण्याचा विचार नक्की करू शकता. अन्यथा आपल्या सध्याच्या कंपनीकडे अशा प्रकारच्या सेवा देण्याबाबत विचारणा सुद्धा करू शकता.