BSNL (भारत संचार निगम लिमिटेड ) ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. सध्या कंपनीकडे सर्वात स्वस्त असे दोन प्लॅन व्हाउचर आहेत. त्यातील एक प्लॅन हा १,१९८ रुपयांचा असून त्याची वैधता एका वर्षासाठी आहे. तर दुसरपलं हा १,४९९ रुपयांचा असून त्याची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएससाठी विस्तारित वैधता आणि चांगले फायदे मिळतात. या दोन्ही प्लॅन्सविषयी जाणून घेऊयात.

१,१९८ रुपयांचा BSNL व्हाउचर प्लॅन

BSNL च्या १,१९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या वैधतेसह येतो. याचा अर्थ ग्राहकांना वर्षभर सारखे सारखे रिचार्ज करावे लागत नाहीत. या अंतर्गत वापरकर्त्यांना ३०० मिनिटे कोणत्याही नेट व्हॉइस कॉल आणि ३ जीबी महिन्याला डेटा मिळतो. याशिवाय संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना प्रत्येक महिन्याला ३० एसएमएस प्राप्त होणार आहेत. हे पॅकेज केवळ होम लोकेशन मर्यादित नसून तर मुंबई आणि दिल्लीच्या MTNL क्षेत्रांसह राष्ट्रीय रोमींगपर्यंत विस्तारित आहे. याबबातचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

हेही वाचा : नेटफ्लिक्स पाठोपाठ Disney+ Hotstar ग्राहकांना धक्का देणार? पासवर्ड शेअरिंगची मर्यादा ठरवणार, जाणून घ्या

१,४९९ रुपयांचा BSNL व्हाउचर प्लॅन

कंपनीकडे दुसरा व्हाउचर प्लॅन आहे तो म्हणजे १,४९९ रुपयांचा. ग्राहकांना ३३६दिवसांची वैधता मिळते. कमी वैधता असली तरी हा प्लॅन परिपूर्ण आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग ऑफर करते. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगशिवाय ग्राहकांना संपूर्ण ३३६ दिवसांमध्ये दररोज १०० एसएमएस करण्यास मिळतात. हा प्लॅन २४ जीबी हाय स्पीड डेटासह येतो.

BSNL वापरकर्ते बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईट, मोबाइल App, किरकोळ अधिकृत विक्रेते आणि ऑनलाईन रिचार्ज प्लॅटफॉर्मसह विविध चॅनेलद्वारे संबंधित र्केटसह रिचार्ज करून हे प्लॅन सहजपणे सक्रिय करता येऊ शकतात.