इंटरनेट आयुष्याचा भागच झाला आहे. मनोरंजन, शिक्षण, जॉब या सर्व गोष्टींसाठी इंटरनेटची गरज पडते. ही गरज भागवण्यासाठी काही दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. कमी किंमतीमध्ये डेटा प्लान्स उपलब्ध केले जात आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेल आघाडीवर आहेत. मात्र या स्पर्धेत आता बीएसएनएल देखील उतरली आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कमी किंमतीत अधिक डेटा देणारा प्लॅन बीएसएनएलने लाँच केला आहे. ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये हा प्लॅन उपलब्ध करण्यात आला असून त्यात अनलिमिटेड डेटा मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे प्लान

हा २९६ रुपयांचा प्रिपेड प्लान आहे. याची वॅलिडिटी ६० दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजरला १२० जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये कुठलीही लिमिट नसून एकाचवेळी पूर्ण डेटा मिळणार आहे. १२० जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटच्या स्पिडमध्ये घट होऊन ती ४० केबीपीएस इतकी राहील.

(लघुग्रहांपासून पृथ्वीला मिळणार सुरक्षा, NASA ची ‘ही’ चाचणी ठरली यशस्वी)

५ तासांपर्यंत अनलिमिटेड डेटा

या प्लानसोबत इतर फायदे देखील मिळत आहेत. यूजरला या प्लानमध्ये रोज ५ तासांपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळेल. मध्यरात्री १२ पासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत युजरला अनलिमिटेड डेटाचा वापर करता येईल. यासोबतच प्लानद्वारे अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस करता येईल.

जिओच्या प्लानला देईल आव्हान

दरम्यान बीएसएनलचा हा प्लान जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानला अव्हान देईल. कारण जिओच्या प्लानची व्हॅलिडिटी केवळ २८ दिवसांची असून त्यात युजरला दररोज २ जीबी डेटासह फ्री कॉलिंग करण्याची सुविधा मिळते. तसेच युजरला रोज १०० एसएमएस पाठवता येतील. त्या तुलनेत बीएसएनलचा प्लान २९६ रुपयांचा असून यामध्ये ६० दिवस फ्री कॉलिंग आणि १२० जीब डेटा मिळत आहे. त्यामुळे हा प्लान जिओवर भारी पडू शकतो.