BSNL 150 Days Recharge Plan Details : खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे भारतातील लाखो मोबाईल युजर्स अडचणीत सापडले आहेत. पण, जिओ, एअरटेल व व्हीआय यांसारख्या कंपन्या चांगल्या सेवा देऊन, युजर्सना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत याचीसुद्धा काळजी घेत आहेत. परंतु, आता सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सरकारी टेलिकॉम ऑपरेटर बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) त्यांच्या अत्यंत परवडणाऱ्या दीर्घ वैधतेच्या प्लॅनने लोकांची मने जिंकली आहेत.
बीएसएनएल जुन्या आणि परवडणाऱ्या दरांमध्ये रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. बीएसएनएलने फक्त ३९७ रुपयांचा १५० दिवसांच्या वैधतेचा प्लॅन लाँच केला आहे. नवीन ३९७ रुपयांचा प्लॅन केवळ दीर्घ वैधताच देत नाही, तर मोफत कॉलिंग, दैनिक डेटा व एसएमएस फायदेदेखील देतो.
बीएसएनएलच्या ३९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळणार? (BSNL Recharge Plan)
१. अमर्यादित कॉलिंग : पहिल्या ३० दिवसांसाठी स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर मोफत कॉल.
२. दैनिक एसएमएस : ३० दिवसांसाठी दररोज १०० एसएमएस.
३. हाय-स्पीड डेटा : पहिल्या ३० दिवसांसाठी २ जीबी/दिवस (एकूण ६० जीबी).
४. एफयूपीनंतरचा स्पीड : दररोजच्या मर्यादेनंतर ४० केबीपीएस.
पहिल्या ३० दिवसांसाठी पूर्ण फायदे लागू असले तरी सिम १५० दिवसांसाठी सक्रिय राहते, जे कमीत कमी किमतीत त्यांचा नंबर ॲक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी बेस्ट आहे.
बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्लॅन (BSNL Recharge Plan)
ज्यांना रिचार्ज प्लॅनच्या संपूर्ण कालावधीसाठी डेटा लाभ हवा आहे त्यांच्यासाठी, बीएसएनएल १६० दिवसांचा ९९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल…
१. १६० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा
२. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग
३. दररोज १०० मोफत एसएमएस
४. जास्त पैसे खर्च न करता दीर्घकालीन फायदे मिळविण्यासह दररोज डेटा हवा असलेल्या युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.