BSNL ही एक सरकारी कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी भारत संचार निगम लिमिटेड अनेक प्लॅन्स लॉन्च करत असते. बीएसएनएलकडे त्यांच्या ग्राहकांसाठी ८४ दिवसांच्या वैधतेचे दोन प्रीपेड प्लॅन्स आहेत. हे दोन प्लॅन सरकारी टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांसाठी चांगले ठरू शकतात. BSNL सध्या आपले ४जी पॅन इंडिया लॉन्च करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तथापि, अजूनही बऱ्याच लोकांसाठी हे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. जर का तुम्ही ८४ दिवसांच्या वैधता असलेले प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल तर तुम्हाला BSNL हे दोन प्रीपेड प्लॅन जाणून घेतले पाहिजे.

BSNL चा ५९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅन जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोजच्या डेटासह इतर अनेक फायदे मिळतात. याची वैधता ८४ दिवसांची आहे. दररोज ३जीबी डेटा , अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोजचे १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. यासह झिंग अॅस्ट्रोसेल आणि गेमिंग सेवा सारख्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य प्रवेश यासारखे अतिरिक्त फायद्यांचा समावेश यात आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा : Friendship Day 2023: तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीला गिफ्ट करु शकता ‘ही’ स्वस्तात मस्त गॅजेट्स, पहा भन्नाट गिफ्ट आयडिया

तसेच या प्लॅनमध्ये मोफत PRBT चा देखील समावेश आहे. तथापि, प्लॅनमधील मुख्य फीचर म्हणजे रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा मिळूशकतो. म्हणजेच तुम्हाला अनलिमिटेड डेटा वापरायचा असेल तर रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत जागावे लागेल. बीएसएनएलचा हा एकमेव प्रीपेड प्लॅन आहे जो रात्रीच्या वेळी ग्राहकांना अनलिमिटेड डेटा ऑफर करतो.

BSNL चा ७६९ रुपयांचा प्लॅन

BSNL चा ७६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोजचा २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनची वैधता देखील ८४ दिवसांची आहे. बीएसएनएल ट्यून्स, Eros Now Entertainment Services, Hardy Mobile Gaming, Lystn Music Services आणि अन्य अतिरिक्त फायदे यात मिळतात. OTT (ओव्हर-द-टॉप) सेवा बंडल झाल्यामुळे हा प्लॅन ५९९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा थोडासा महाग आहे. तुम्हाला तुमच्या या प्लॅनमध्ये अधिकचा डेटा हव्या असल्यास ५९९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तथापि तुम्हाला Eros Now Entertainment चा OTT लाभ हवा असेल, तर तुम्ही ७६९ रुपयांचा प्लॅनचा विचार करावा.