सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल आपल्या प्रीपेड योजनांसह जिओ, व्होडाफोन आयडीया आणि एअरटेल यांच्याशी स्पर्धा करत आहे. बीएसएनएलचे काही प्लान ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत. यात दररोज ५ जीबीपर्यंत डेटा मिळतो. बीएसएनएलच्या अशाच काही प्लानबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये जास्त डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस आणि अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत. चला जाणून घेऊया.
बीएसएनएलचा १८५ आणि २९८ रुपयांचा प्लान
बीएसएनएलच्या १८५ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज १ जीबी डेटा मिळेल. दररोज १०० मोफत एसएमएससह हा प्लान अमर्यादित कॉलिंग येतो. कंपनीचा २९८ रुपयांचा प्लानसुद्धा समान फायद्यांसह येतो, परंतु त्याची वैधता ५६ दिवस आहे.
बीएसएनएलचा १८७ आणि ३४७ रुपयांचा प्लान
कंपनी १८७ रुपयांचा व्हॉईस प्लान देत आहे. Voice_187 असं या प्लानचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएससह २८ दिवसांची वैधता मिळेल. प्लानमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. कंपनीच्या ३४७ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि ५६ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात.
Poco x4 5G लवकरच भारतात आणतोय १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा फोन, जाणून घ्या डिटेल्स
बीएसएनएलचा २९९ आणि २४७ रुपयांचा प्लान
कंपनी २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा देत आहे. या प्लानमध्ये, तुम्ही ३० दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळतो. त्याचप्रमाणे २४७ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्ही दैनंदिन मर्यादेशिवाय ५० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएस मिळतील. प्लानमध्ये तुम्हला Eros Now आणि BSNL Tune चे सबस्क्रिप्शन मिळेल.
बीएसएनएलच्या ‘या’ प्लानमध्ये दररोज ५ जीबी डेटा मिळेल
बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या स्पेशल टेरिफ व्हाउचरमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटासह १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत. या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. जर तुम्हाला दररोज ५ जीबी डेटा हवा असेल, तर तुम्हाला ५९९ रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करावे लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अमर्यादित मोफत नाईट डेटा देखील मिळतो. प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील दिले जात आहे.