BSNL Recharge Plan For Three Family Members : टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएल आकर्षक रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. खासगी ऑपरेटर्समुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने एक अनोखा प्लॅन लाँच केला आहे, जो सिंगल रिचार्ज प्लॅनमध्ये तीन कुटुंबीयांपर्यंतच्या कनेक्शनसाठी मोफत कॉल आणि डेटा पुरवितो. जर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी बजेट-फ्रेंडली रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर बीएसएनएलचा नवीन प्लॅन तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकतो.
कुटुंबातील प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच. तर प्रत्येक जण आपापल्या सोईनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतो. पण, जर मोबाईल प्लॅन रिचार्ज करण्यासाठी असे प्रत्येक महिन्याला जास्तीचे पैसे करण्यापेक्षा एखादा ‘फॅमिली प्लॅन’ असला, तर त्याचा कुटुंबातील सदस्यांनाही फायदा होईल आणि पैशांचीही मदत होईल. नेमका हाच विचार करून बीएसएनएलचा नवीन उपक्रम खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सशी स्पर्धा करण्यासाठी आणि ग्राहकांना परवडणारे उपाय शोधण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. स्वस्तात मस्त आणि त्रासमुक्त कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा नवीन ऑफरचा उद्देश असणार आहे, ज्यामुळे एखाद्या कुटुंबातील सदस्य अनेक रिचार्ज न करता ‘कनेक्टेड’ राहतील. या प्लॅनद्वारे युजर्स एकाच पेमेंटअंतर्गत अमर्यादित व्हॉइस कॉल, हाय-स्पीड डेटा व अतिरिक्त फायदे मिळवू शकतात.
बीएसएनएलचा ९९९ रुपयांचा फॅमिली प्लॅन (BSNL Family Plan) :
हा पोस्टपेड प्लॅन कुटुंबातील सदस्यांसाठी तयार करण्यात आला आहे, जो एकाच किमतीत शेअर्ड कनेक्शन (shared connection) देतो. म्हणजेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने रिचार्ज केल्यास त्याला दोन अतिरिक्त कनेक्शन जोडण्याची क्षमता मिळते. थोडक्यात या एकाच प्लॅनचा कुटुंबातील तीन सदस्य वापर करू शकतात आणि हा प्लॅन फक्त ९९९ रुपयांचा असणार आहे.
फायद्यांसाठी ९९९ रुपयांच्या योजनेत प्राथमिक युजर्ससाठी अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दोन अतिरिक्त कनेक्शन उपलब्ध आहेत. प्रत्येक युजरला ७५ जीबी डेटा मिळतो, जो तिन्ही युजर्ससाठी एकत्रितपणे ३०० जीबी डेटा दिला जातो. त्यामध्ये प्रत्येक युजरसाठी दररोज १०० मोफत एसएमएससुद्धा दिले जाणार आहेत. बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एका पोस्टद्वारे या आकर्षक नवीन प्लॅनबद्दलची माहिती शेअर केली आहे. इच्छुक ग्राहक बीएसएनएल वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ केअर ॲपद्वारे या प्लॅनसाठी रिचार्ज करू शकतात.