ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडून जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स सतत जाहीर केले जातात. याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलने काही नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत ११९८, ४३९, २६९, ७६९ रुपये आहे. या आकर्षक प्लॅन्सच्या लाँचनंतर बीएसएनएल लवकरच सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त असणारे दोन रिचार्ज प्लॅन बंद करणार आहे. काय आहे या प्लॅन्सची किंमत जाणून घ्या.
ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये बीएसएनएलचे प्लॅन्स लोकप्रिय आहेत. याच सेगमेंटमधील फायबरचे दोन प्लॅन्स बंद करण्यात येणार आहेत. या दोन्ही प्लॅन्सची किंमत २७५ रुपये आहे, पण यावर देण्यात आलेल्या ऑफर्स वेगवेगळ्या आहेत. काय आहेत यावरील ऑफर जाणून घ्या.
आणखी वाचा : BSNL ने लाँच केले २६९ आणि ७६९ रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन; यावर काय ऑफर आहे लगेच जाणून घ्या
बीएसएनएलचा २७५ रुपयांचा फायबर प्लॅन
यामधील एका प्लॅनवर ३०mbps च्या स्पीडबरोबर ३३०० जीबी डेटा उपलब्ध होतो, तर दुसऱ्या प्लॅनवर ६०mbps च्या स्पीडबरोबर ३३०० जीबी डेटा उपलब्ध होतो. या दोन्ही रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच हे दोन्ही प्लॅन एका महिन्यासाठी उपलब्ध होतात.