BSNL Launches Intranet TV Service With Over 500 Live Channels : भारतातील काही निवडक प्रदेशांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने पहिली फायबर-बेस्ड इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल आयएफटीव्ही (BSNL IFTV) नावाची ही सेवा गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली. ही सेवा दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा नवीन लोगो आणि सहा नवीन सुविधांसह सादर करण्यात आली आहे. हे BSNL च्या फायबर-टू-द-होम (FTTH) नेटवर्कचा वापर वापरकर्त्यांना स्पष्ट व्हिज्युअल आणि पे टीव्ही सुविधेसह थेट टीव्ही सेवा प्रदान करते आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कंपनीने Wi-Fi रोमिंग सेवादेखील सुरू केली आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहक कंपनीच्या हॉट स्पॉट्सवर हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकतात. परिणामत: त्यांच्या डेटाची किंमत कमी होईल.
बीएसएनएल आयएफटीव्ही सेवा (BSNL IFTV) :
बीएसएनएलने त्यांच्या एक्स (ट्विटर) @BSNLCorporate अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “नवीन आयएफटीव्ही (BSNL IFTV) सेवेमुळे मध्य प्रदेश व तमिळनाडूमधील त्यांचे ग्राहक हाय-स्पीड गुणवत्तेत ५०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल्स पाहू शकतील. त्याशिवाय यात पे टीव्ही कंटेन्ट आणि इतर लाइव्ह टीव्ही सर्व्हिसेसही देण्यात येणार आहेत”.
त्याचबरोबर टीव्ही स्ट्रीमिंगसाठी वापरला जाणारा डेटा त्यांच्या डेटा पॅकपासून वेगळा असेल आणि आयएफटीव्ही पॅकमधून तो वजा केला जाणार नाही. त्याऐवजी स्ट्रीमिंगसाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जाईल. त्याचबरोबर लाइव्ह टीव्ही सेवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केवळ BSNL FTTH ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते आहे.
हेही वाचा…Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
BNSL कडून लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म, स्ट्रीमिंग ॲप्स जसे की, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिस्नी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स , यूट्यूब व झी यांव्यतिरिक्त ५०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि गेम्सदेखील ऑफर करण्यात येणार आहेत. पण, ऑपरेटरच्या म्हणण्यानुसार, बीएसएनएल आयएफटीव्ही (BSNL IFTV) सेवा सध्या फक्त Android टीव्हीवर उपलब्ध असेल. Android 10 किंवा त्यानंतरचे टीव्ही असणारे ग्राहक गूगल प्ले स्टोअरवरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करू शकतात .
BSNL IFTV सेवेचे सदस्यत्व घेण्यासाठी, ग्राहक प्ले स्टोअरवरून BSNL Selfcare ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्यासाठी नोंदणी करू शकतात. हे पाऊल कंपनीने सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी सेवा प्रदान करण्यासाठी उचलले आहे.