BSNL Affordable Recharge Plan Price : आजच्या घडीला मोबाइलमध्ये रिचार्ज केल्याशिवाय आपण साधी गाणीसुद्धा ऐकू शकत नाही. पण, सध्याच्या वाढत्या रिचार्ज प्लॅनमुळे अनेक ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. पण, या सगळ्यात मात्र भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी सतत काही ना काही धडपड करताना दिसते आहे. एकीकडे कंपनी आपले 4G टॉवर्स आणण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे ते नवीन प्लॅनसह (BSNL Affordable Recharge Plan) ग्राहकांना खूशसुद्धा करत आहेत आणि खाजगी दूरसंचार कंपन्यांवर दबाव आणत आहेत. तर आता कंपनीने बजेट-फ्रेंडली प्लॅन सादर केला आहे, ज्यामुळे एअरटेल आणि व्हीआयसारख्या कंपन्यांसाठी नवीन आव्हान उभे राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेल आणि व्हीआयने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. तसेच हे पाहता आणखीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने स्वस्त प्लॅन ऑफर करते आहे. काही दिवसांपूर्वी बीएसएनएलने एक स्वस्तात-मस्त ३६५ दिवसांचा प्लॅन आणला होता, तर आता कंपनी ९० दिवसांचा प्लॅनसुद्धा घेऊन आली आहे.

रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या खर्चापासून आराम (BSNL Affordable Recharge Plan) …

बीएसएनएलने त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून नवीन रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. कंपनी केवळ ४११ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना ९० दिवसांसाठी दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटाचा आनंद देऊ शकणार आहे. ४११ रुपयांच्या प्लॅनच्या संपूर्ण कालावधीत एकूण १८० जीबी डेटा ग्राहक ॲक्सेस करू शकतात, ज्यामुळे रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या खर्चापासून तुम्हाला थोडा आराम मिळेल.

इतर कोणताही दूरसंचार प्रदाता ९० दिवसांच्या वैधतेसह एवढा स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत नाही, पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या डेटा व्हाउचर प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा समावेश नसणार आहे. तुम्हाला डेटासह कॉलिंग सेवांची आवश्यकता असल्यास, तुम्ही बीएसएनएलच्या इतर योजनांपैकी एखाद्या प्लॅनचा विचार करू शकता.

याव्यतिरिक्त, बीएसएनएलने अलीकडेच एक नवीन ३६५ दिवसांचा वार्षिक प्लॅनसुद्धा लाँच केला आहे. केवळ १५१५ रुपये किमतीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना जलद, अडथळ्याशिवाय कनेक्टिव्हिटीचा आनंद, तर तुमची डेटा गरज पूर्ण करणारा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पण, ४११ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे यात कॉलिंग सुविधा देण्यात आलेली नाही.