मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. काळानुसार मोबाईलमध्ये नवनवीन फीचर (Feature), विविध ॲप्स (Apps), तर सिम कार्ड (Sim Card)देखील अपडेट होताना दिसत आहेत. एअरटेल (Airtel), वोडाफोन (Vodaphone), जिओ (Jio) आदी अनेक कंपन्यांची सिम कार्ड्स मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जर तुमचे कार्ड बीएसएनएल (BSNL) असेल, तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. बीएसएनएलने (BSNL) ४जी (4G) सिम अपडेट करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास घोषणा करण्यात आली आहे.

ग्राहकांसाठी खास ऑफर :

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

कंपनी बीएसएनएल ग्राहकांना विनामूल्य ४जी (4G) सिम अपग्रेड करण्याची ऑफर देत आहे. तुम्ही बीएसएनएल वापरकर्ते असाल, तर २जी, ३जी (2G/3G) असणारे तुमचे सिम ४जीमध्ये (4G) कन्व्हर्ट (Convert) करणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरणार आहे. बीएसएनएल आंध्र प्रदेश यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल ग्राहकांना २जी/३जीचे (2G/3G) सिम कार्ड ४जीमध्ये कन्व्हर्ट (4G) करणाऱ्या ग्राहकांना ४जीबी (4GB)डेटा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत मिळणार आहे.

हेही वाचा…पुढील २१ दिवसात तुमचं Gmail अकाउंट गूगल बंद करू शकतं! फोटो, फाईल्स सगळं होणार गायब, कसं वाचवाल?

तुमचे सिम कार्ड २जी, ३जी आहे की, ४जी कसे ओळखणार?

बीएसएनएलच्या (BSL) सगळ्या ४जी (4G) सिम कार्डांवर ‘बीएसएनएल ४जी’ (BSNL 4G) असे लिहिलेले असते. त्यामुळे २जी, ३जी (2G/3G) व ४जी (4G) सिममधील फरक ओळखणे सोपे जाते. बीएसएनएल ४जी (BSNL 4G) सिम कार्ड लाल रंगाच्या नवीन शेडमध्ये येते आणि ते नियमित आकाराच्या सिम कार्डच्या ॲडॉप्टरसह नॅनो-सिम आकारासह येते. तसेच सिम प्रकार तत्काळ तपासण्‍यासाठी ५४०४० (54040) वर ‘सिम’, असा मेसेजदेखील तुम्ही पाठवू शकता.

बीएसएनएल २जी, ३जी (2G/3G) सिमवरून ४जी (4G)वर कसे अपग्रेड करायचे?

बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र, फ्रँचायझी कार्यालये, रिटेल स्टोअर्ससारख्या निवडक ठिकाणी तुम्ही मोफत ४जी (4G) सिम कार्ड अपग्रेड करू शकता आणि या खास ऑफरचा लाभ घेऊ शकता. लक्षात ठेवा की, ४जी (4G) सिम कार्डवर अपग्रेड करणे विनामूल्य आहे आणि एकदा अपग्रेड केल्यानंतर तुम्ही ४जी (4G) इंटरनेटचा वापर करू शकता.

महत्त्वाची कागदपत्रे :
सिम अपग्रेड प्रक्रियेसाठी तुम्हाला केवायसी (KYC) करण्याकरिता आधार कार्डाची आवश्यकता आहे. एक्स (ट्विटर) अकाउंटवरून मिळालेल्या माहितीनुसार- बीएसएनएल (BSNL) जून २०२४ पर्यंत ४जी (4G) रोलआउट पूर्ण करेल आणि कंपनी त्यानंतर ५जी (5G) नेटवर्कवर काम करण्यास सुरुवात करेल, असे सांगण्यात आले आहे. सिम कार्ड अपडेटिंग आणि ऑफरची माहिती @BSNL_ap_circle यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.