भारतात सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल , वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल अशा चार प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी बीएसएनएल अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. बीएसएनएल कंपनी भारतात ४जी लॉन्च करण्यासाठी देशांतर्गत टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे बीएसएनएलने नुकतेच दोन नवीन प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत. हे दोन्ही प्लॅन हे डेटा व्हाउचर प्लॅन्स आहेत. दोन्ही प्लॅन्स पूर्ण भारतात उपलब्ध आहेत. डेटा व्हाउचर हे तुमचे प्लॅन ऍक्टिव्ह ठेवत नसते. तर हे दोन प्लॅन्स किती रुपयांचे आहेत आणि त्यात तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.
जर का तुम्हाला अधिक डेटा वापरण्यासाठी हवा आहे. तसेच तुमच्याकडे एक बेस प्रीपेड प्लॅन आहे तर तुम्ही तुमची डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी या दोन नवीन डेटा व्हाउचरचा उपयोग करू शकता. बीएसएनएलने जे दोन नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत ज्याची किंमत अनुक्रमे ४११ आणि ७८८ रुपये इतकी आहे. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : रिलायन्स जिओ, एअरटेलपेक्षा BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो दररोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या
BSNL चा ४११ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या ४११ रुपयांच्या प्लॅनची वैधता ९० दिवस इतकी आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये याशिवाय अजून काहीही फायदे मिळत नाहीत. म्हणजेच तुम्हाला एककून १८० जीबी हाय स्पीड डेटा वापरायला मिळतो. डेटा संपल्यानंतर वापरकर्त्यांसाठी स्पीड कमी होऊन तो ४० kbps इतका होतो.
BSNL चा ७८८ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या ४११ रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत ७८८ रुपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट वैधता मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये मिळणारी वैधता १८० दिवसांची आहे. म्हणजेच हा प्लॅन महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर त्याचा स्पीड वापरकर्त्यांसाठी ४० kbps इतका होईल. यामध्ये एकूण ३६० जीबी डेटा मिळतो. अन्य कोणताही फायदा या प्लॅनमध्ये मिळत नाही. ज्यांना अधिक कालावधीसाठी डेटाची गरज असते त्यांच्यासाठी हे प्लॅन उपयुक्त आहेत. बीएसएनएल जेव्हा आपले ४ जी नेटवर्क लॉन्च करेल तेव्हा हे प्लॅन्स ग्राहकांसाठी अजूनच फायदेशीर ठरू शकतात.