ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडुन जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स सतत जाहीर केले जातात. याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलने दोन नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत ११९८ आणि ४३९ रुपये आहे. या प्लॅन्सवर कॉलिंग आणि डेटाची काय ऑफर देण्यात आली आहे जाणून घ्या.

११९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
  • ११९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ३६५ दिवस म्हणजेच एका वर्षासाठी उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला ३ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅन वर ३० फ्री एसएमएस देखील उपलब्ध होतात.
  • या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनवरील ऑफर्स प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिकली रिन्यू होतात.

WhatsApp Avatar Feature : व्हॉटसअ‍ॅपवर शेअर करता येणार ‘अवतार’! काय आहे नवे फीचर जाणून घ्या

४३९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • ४३९ रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • हा रिचार्ज प्लॅन त्या व्यक्तींसाठी जास्त उपयुक्त आहे ज्यांना डेटापेक्षा कॉलिंगची जास्त गरज भासते.
  • या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह, ३०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते. तसेच या प्लॅनवर डेटा उपलब्ध होत नाही.

याआधी बीएसएनएलने २६९ आणि ७६९ रुपयांचे रिचार्ज प्लॅन लाँच केले होते, यावर काय ऑफर आहेत जाणून घ्या.

२६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतोम
  • अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • या रिचार्ज प्लॅनमधील वैशिष्ट्य म्हणजे या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना मोफत बीएसएनएल ट्युनस वापरता येतील, म्हणजे ग्राहक त्यांचे आवडते कोणतेही गाणे कॉलर ट्युनसाठी वापरू शकतील आणि ते कितीही वेळा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • इरोज नाव एंटरटेनमेंट, चॅलेंजेस अरीना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाईल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंग या ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.

आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • इरोज नाव एंटरटेनमेंट, चॅलेंजेस अरीना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाईल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंग या ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.
  • २६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे या प्लॅनवरदेखील आवडती रिंगटोन निवडता येते.
  • या दोन्ही प्लॅनमध्ये फक्त कालावधीचा फरक आहे. ७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांसाठी उपलब्ध होतो.

Story img Loader