ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडुन जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स सतत जाहीर केले जातात. याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलने दोन नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत २६९ आणि ७६९ रुपये आहे. या प्लॅन्सवर कॉलिंग आणि डेटाची काय ऑफर देण्यात आली आहे जाणून घ्या.

२६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतोम
  • अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • या रिचार्ज प्लॅनमधील वैशिष्ट्य म्हणजे या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना मोफत बीएसएनएल ट्युनस वापरता येतील, म्हणजे ग्राहक त्यांचे आवडते कोणतेही गाणे कॉलर ट्युनसाठी वापरू शकतील आणि ते कितीही वेळा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • इरोज नाव एंटरटेनमेंट, चॅलेंजेस अरीना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाईल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंग या ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.

Iphone : आयफोनवरून ‘या’ देशाने अ‍ॅपलला ठोठावला २ कोटी डॉलर्सचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतोम
  • अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • इरोज नाव एंटरटेनमेंट, चॅलेंजेस अरीना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाईल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंग या ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.
  • २६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे या प्लॅनवरदेखील आवडती रिंगटोन निवडता येते.
  • या दोन्ही प्लॅनमध्ये फक्त कालावधीचा फरक आहे. ७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांसाठी उपलब्ध होतो.

Story img Loader