रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) देखील देशभरात मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी प्रदान करते. Jio, Airtel आणि Vi कडे त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. BSNL आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी व्हॉइस आणि डेटासह अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन्स देखील ऑफर करते. आज आम्‍ही तुम्‍हाला बीएसएनएलच्‍या प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत जे कमी किमतीत दीर्घ वैधता देतात. बीएसएनएलचे ५०० रुपयांपेक्षा कमी प्लॅन जाणून घ्या…

500 रुपये से कम वाले BSNL Prepaid Plan
सर्वप्रथम BSNL च्या STV_399 बद्दल बोलायाचं झालं तर या प्लॅनमध्ये दररोज १ GB डेटा उपलब्ध आहे आणि त्याची वैधता ८० दिवस आहे. ३९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत BSNL ट्यून आणि लोकधुन कंटेंट देखील देते.

How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…

BSNL चा ४२९ रुपयांचा प्लान देखील आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता ८१ दिवसांची आहे आणि यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस प्रतिदिन मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये इरॉस नाऊ एंटरटेनमेंट अॅपचा एक्सेस देते.

आणखी वाचा : Redmi Note 10T 5G केवळ ४१६ रुपयांमध्ये घरी घेऊन जा, फ्लिपकार्टवरची ही ऑफर जाणून घ्या

BSNL च्या पुढच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर हा प्रीपेड प्लॅन जास्त डेटा खर्च करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. या प्लॅनची ​​किंमत ४७७ रुपये आहे आणि १०० GB हाय-स्पीड डेटा देते. १०० GB डेटा संपल्यानंतर, युजर्स ८० Kbps च्या वेगाने डेटा खर्च करू शकतात. प्लॅनची ​​वैधता ६० दिवसांची आहे. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. ४४७ रुपयांच्या या प्लॅनसह युजर्सना BSNL Tunes आणि Eros Now मनोरंजन सेवा देखील मिळतात.

BSNL च्या ४९९ रुपयांच्या पॅकमध्ये युजर्सना तीन महिन्यांची वैधता देण्यात आली आहे. STV_499 मध्ये ग्राहक दररोज २ GB डेटा खर्च करू शकतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी एकूण १८० GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिडेट व्हॉईस कॉल्स आणि १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. परंतु BSNL ग्राहकांना या प्लॅनमध्ये कोणतेही OTT सबस्क्रिप्शन मिळणार नाही.

Story img Loader