देशातील सरकारी दूरसंचार कंपनी, भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) खाजगी क्षेत्रातील मोबाईल सेवा प्रदाता एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओशी स्पर्धा करण्यास तयार आहे. बीएसएनएलने या कंपन्यांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आपला १९७ रुपयांचा उत्कृष्ट प्लॅन सादर केला आहे. यात मोबाईल वापरकर्त्याला १५० दिवसांची वैधता आणि २ जीबी डेटा मिळेल. जाणून घेऊया बीएसएनएलच्या या प्लॅन विषयी.
बीएसएनएलच्या या १९७ रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना १५० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज २ जीबीचा डेटा आणि फ्री एसएमएसची सुविधा मिळेल. बीएसएनएलनुसार, या प्लॅनमध्ये ग्राहकाला १५० दिवसांची वैधता तसेच १८ दिवसांसाठी २जीबी डेटा मिळेल. जे नंतर ४०kbps च्या वेगाने उपलब्ध होईल.
तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप खराब झालाय? सारखा चार्ज करावा लागत असेल तर जाणून घ्या ‘या’ टिप्स
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना १५० दिवसांसाठी इनकमिंग कॉलची सुविधा मिळेल, तर १८ दिवसांनंतर ग्राहकांना आऊटगोइंग कॉलसाठी टॉप-अप रिचार्ज करावा लागेल. याचाच अर्थ असा की ग्राहकांना १८ दिवसांसाठी दररोज २जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.
या प्लॅनमध्ये तुम्हाला झिंग अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. एकदा हे फायदे संपले की, तुम्हाला सर्व फायद्यांसाठी पुन्हा रिचार्ज करावे लागेल. तुम्ही टॉप-अप रिचार्ज देखील करू शकता. ज्यांना जास्त कॉल्स घ्यायला आवडतात आणि जे जास्त डेटा आणि कॉलिंगचा वापर करत नाहीत अशा लोकांसाठी हा एक परिपूर्ण प्लॅन आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
मेसेजला लगेच रिप्लाय मिळाला नाही तर तुमचीही चिडचिड होते? जाणून घ्या यामागचं कारण
एअरटेल आपल्या ग्राहकांना ९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आणि २००एमबी डेटा मोफत देत आहे. ज्यामध्ये ग्राहकाला २८ रुपयांच्या आसपास टॉक-टाइम देखील मिळतो. त्याच वेळी, वोडाफोन-आइडिया देखील आपल्या ग्राहकांना ९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आणि २००एमबी डेटा देत आहे आणि यामध्ये ग्राहकांना ९९ रुपयांचा टॉक-टाइम मिळतो.