जर तुम्ही बीएसएनएल ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकांना आता बीएसएनएलची उर्वरित शिल्लक , डेटा आणि एसएमएस तपासण्याच्या सर्वात सोप्या पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व कामांसाठी कंपनीने वेगवेगळे यूएसएसडी कोड दिले आहेत. एवढंच नाही तर तुम्ही हे काम बीएसएनएलच्या अधिकृत ॲपमधून देखील तपासू शकता. जर तुम्ही देखील बीएसएनएल वापरकर्ते असाल, तर खाली दिलेल्या माहितीद्वारे तुम्ही देखील बीएसएनएल नंबरवर उर्वरित शिल्लक , डेटा इत्यादींची माहिती मिळवू शकता.

बीएसएनएल शिल्लक कशी तपासायची ?

तुमच्या खात्यातील मुख्य शिल्लक जाणून घेण्यासाठी तुमच्या बीएसएनएल नंबरवरून *१२३# डायल करा. यूएसएसडी कोड डायल केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक संदेश दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला बीएसएनएलच्या शिल्लक रकमेबद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय तुम्ही *११२# डायल करून इंटरनेट डेटा बॅलन्स, एसएमएस बॅलन्स इत्यादी माहिती मिळवू शकता.

बीएसएनएल डेटा बॅलन्स कसा तपासायचा ?

बीएसएनएल ४ जी डेटा शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला १२४# डायल करावे लागेल. तुम्ही २ जी किंवा ३ जी ग्राहक असल्यास, *१२३६# डायल करा किंवा तुम्ही ११२# देखील डायल करू शकता. रात्रीचे जीपीआरएस जाणून घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवरून *१२३८# डायल करणे आवश्यक आहे.

बीएसएनएल एसएमएस तपासायचे कसे ?

बीएसएनएल एसएमएस शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला १२३१# किंवा १२३५# किंवा १२५# डायल करावे लागेल. याशिवाय, बीएसएनएल नॅशनल एसएमएस बॅलन्स तपासण्यासाठी, एखाद्याला *१२३२# डायल करावे लागेल.

ॲप्लीकेशनद्वारे बीएसएनएल शिल्लक कशी तपासायची ?

तुम्ही माय बीएसएनएल ॲपद्वारे तुमचा सक्रिय रिचार्ज, शिल्लक आणि वैधता देखील तपासू शकता. हे ॲप अँड्रॉईड गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन ॲप स्टोअर या दोन्हींवर उपलब्ध आहे.

कॉलद्वारे कशाप्रकारे शिल्लक जाणून घ्यायची ?

तुम्ही कॉलद्वारे तुमची बीएसएनएल शिल्लक देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बीएसएनएल नंबरवरून १५०३ किंवा १८००-१८०-१५०३ डायल करावा लागेल. हा नंबर टोल-फ्री आहे. तसंच हा नंबर बीएसएनएल नेट बॅलन्स, व्हॉइस कॉल बॅलन्स, एसएमएस बॅलन्स आणि बरेच काही तपासण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो.