भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही भारतातील एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल कंपनी लवकरच आपल्या ब्रॉडबँड सेवेमध्ये मोठे बदल करणार आहे. ही कंपनी सध्या भारतातील सर्वात मोठ्या फायबर इंटरनेट सेवा (ISPs) एक आहे. बीएसएनएल लवकरच त्यांचा एंट्री लेव्हल प्लॅन ज्याची किंमत ३२९ रुपये आहे. हा प्लॅन अनेक राज्यांमध्ये कंपनी बंद करणार आहे. डिजिटल डिव्हाईड कमी करण्यासाठी हा प्लॅन आहे. आणि पूर्ण देशभरामध्ये वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अतिशय स्वस्त प्रवेश ऑफर करते.
बीएसएनएल कंपनी आपला ३२९ रुपयांचा प्लॅन काही बंद राज्यांमध्ये बंद करणार असून हा प्लॅन या महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० जुलै २०२३ पासून बंद होणार आहे. ३२९ रुपयांचा प्लॅन बंद करण्यामागचे कारण अजून उघड झालेले नाही. मात्र बीएसएनएलला असे करण्याची सवय आहे हे लक्षात घेण्यासारखे गोष्ट आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीचे म्हणणे आहे की ठराविक तारखेला ठराविक प्लॅन काढून टाकेल परंतु प्रत्यक्षात तसे करत नाही. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
बीएसएनएल कंपनी आपला प्लॅन ज्या राज्यांमध्ये बंद करणार आहे त्यामध्ये बिहार आणि झारखंड, आसाम आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळतात हे पाहुयात.
BSNL चा ३२९ रुपयांचा प्लॅन
BSNL च्या ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २० MBPS चा स्पीड आणि १ हजार जीबी इतका (fair usage policy) डेटा वापरायला मिळतो. डेटाच्या संपल्यानंतर याचा स्पीड ४ MBPS पर्यंत कमी होतो. यासह वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री लँडलाईन कनेक्शनही मिळते. लँडलाइन कनेक्शनसाठी इन्स्ट्रुमेंट ग्राहकाला स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार आहे. राज्याच्या शहरी भागातील ग्राहकांसाठी प्लॅन सहसा उपलब्ध नसते. हे ग्रामीण भागांमधील किंवा लहान शहरांमधील कमी कमाई असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे जेणेकरून त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळू शकेल.