बीएसएनएलच्या वापरकर्त्यांसाठी ४२ रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन यांच्या सर्वात कमी किंमतीच्या प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये नेट आणि कॉलिंग दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. बीएसएनएलच्या या प्लॅनच्या तुलनेत एअरटेल, जिओ आणि वोडाफोन या कंपन्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये काय ऑफर आहेत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Vodaphone Idea च्या ८२ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा SonyLIV प्रीमियमचे सबस्क्रीपशन; जाणून घ्या पुर्ण ऑफर

बीएसएनएलचा ४२ रुपयांचा प्लॅन

  • ४२ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये १ जीबी डेटा दिला जातो.
  • हा प्लॅन २० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • व्हॉइस कॉलसाठी १०० मिनिटांचा कालावधी दिला जातो.
  • याव्यतिरिक्त फ्री कॉलिंग किंवा एसएमएस सेवा उपलब्ध नाही.

एअरटेलचा ५८ रुपयांचा प्लॅन

  • ५८ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एकुण ३ जीबी डेटा दिला जातो.
  • फोनमध्ये अस्तित्वात असलेल्या रिचार्ज प्लॅन जोपर्यंत आहे तोपर्यंत या प्लॅनच्या सुविधा वापरता येतात.
  • या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग किंवा एसएमएस सेवा उपलब्ध नाही.

जिओचा ५० रुपयांचा प्लॅन

  • जिओच्या ५० रुपयांच्या प्लॅनमध्ये ३९.३७ रुपयांचा टॉकटाइम मिळतो.
  • यामध्ये डेटा पॅक मिळत नाही.
  • या रिचार्ज प्लॅनचा निश्चित कालावधी नसतो.

वोडाफोन आयडियाचा ४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वोडाफोन आयडियाच्या ४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबी डेटा दिला जातो.
  • व्हॉइस कॉलिंगसाठी ३८ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. ज्यामध्ये २.५ पैसे/सेकंद चार्ज असतो.
  • हा रिचार्ज प्लॅन १० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl rs 49 cheapest recharge with data and calling service pns