Union Budget 2025 Nirmala Sitharaman Announced Mobile Phone Batteries Become Cheaper : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ (Union Budget 2025) मध्ये तेलबिया आणि डाळींच्या योजनांपासून ते ५० नवीन पर्यटन स्थळे ते अगदी ग्रामीण भागांमध्ये नळाद्वारे पाणी यांसारख्या अनेक सामान्य नागरिकांच्या गरजेच्या गोष्टींची घोषणा केली. त्याचबरोबर स्मार्टफोन आणि स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली. यामुळे देशातील स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनची एकूण किंमत कमी होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या केंद्रीय अर्थसंकल्पाचा (Union Budget 2025) उद्देश स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि भारतीय ग्राहकांसाठी ही इलेक्ट्रॉनिक उत्पादने अधिक परवडणारी बनवणे हे असणार आहे. सरकारच्या पुढाकारामुळे स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनची किंमती कमी होईल , देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी नव सेंटर उभारले जाईल (Union Budget 2025) …

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला (Union Budget 2025) . त्यात मोबाईल फोनच्या बॅटरी स्वस्त होणार, टीव्हीचे देशांतर्गत उत्पादित होणारे पार्ट्स स्वस्त होणार असे सांगितले. त्याचप्रमाणे सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय हे शिक्षण क्षेत्रासाठी नव सेंटर उभारले जाईल. त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली जाईल ; असे सांगण्यात आले आहे.

आजकाल सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI (एआय)ची जोरदार चर्चा सुरू आहे. एआयसह लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी व सरळ व्हावी हा एआयचा उद्देश आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात सुद्धा या शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन घोषणा करण्यात आली आहे; जेणेकरून या क्षेत्रात रिसर्च आणि अभ्यासक्रमांचा विस्तार अधिक चांगला होऊ शकेल.