खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता किकस्टार्टर वरील खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर किकस्टार्टर वरील करण्यात आलेली खरेदी तुमची नक्कीच बचत करणारी ठरणार आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल सुरू होण्याआधीच किकस्टार्टर वरील खरेदीवर मोठी सूट मिळणे सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता अॅमेझॉन एसबीआय कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकांना दहा टक्के सूट मिळवता येणार आहे. या शिवाय इंस्टंट डिस्काउंट, कॅशबॅक सुविधासह अन्य विविध सुविधांचा फायदा घेता येणार आहे. किकस्टार्टर डीलमध्ये कोणत्या वस्तूवर किती सूट मिळणार जाणून घेऊयात.

आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स

टेक्नो स्पार्क-९’ या स्मार्टफोनमध्ये मिळणार सूट
‘टेक्नो स्पार्क-९’ हा स्मार्टफोन सवलतीनंतर ९ हजार ४९९ रुपयांना विकला जात आहे पण एसबीआय कार्डवर सूट मिळाल्यानंतर हा फोन ८ हजार ५४९ रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच या किंमतीत ग्राहकांना फोनचा ६ जीबी रॅम सह १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. ज्या ग्राहकांचे बजेट थोडे कमी असेल त्यांच्यासाठी ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट सवलतीनंतर ८ हजार ०९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु कार्ड सवलतीनंतर हे मॉडेल ७ हजार २८९ रुपयांना मिळेल.

टेक्नो Pop-५ LTE
‘टेक्नो Pop-५ LTE’ या स्मार्टफोनची किंमत भारतात सूटनंतर ६ हजार ०९९ रुपये इतकी आहे. परंतु कार्ड सूटचा फायदा मिळाल्यानंतर ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ ५ हजार ४८९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

स्मार्टटीव्हीच्या खरेदीवर मिळणार मोठी सूट
तुम्हाला तुमचा जुना टीव्ही बदलवायचा असेल, तर किकस्टार्टर डीलमध्ये Mi ४३ inch Full HD Android LED TV 4C हा ४३ इंचाचा टीव्ही ३७ टक्क्यांच्या सूटमध्ये केवळ २१ हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bumper discounts on smartphones to smart tvs in amazon kickstarter deals
Show comments