Google Pay वर केवळ पैसेच ट्रान्सफर केले जात नाहीत तर या माध्यमातून आणखी काही कामे देखील अगदी जलद पद्धतीने करता येतात. अशाच पद्धतीने आपण सोन्याची ऑनलाइन खरेदी आणि विक्री देखील करू शकतो. जर तुम्हाला सोन्याची ऑनलाइन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर गुगल पे आपल्याला मदत करू शकतो. गुगल पेने हे काम एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून सुरु केले आहे. याची माहिती गुगल पेने आपल्या पेजवर दिली आहे.

गुगल पेचे असे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक त्यांच्या गुगल पेवरून ९९.९९ टक्के शुद्ध २४ कॅरेट सोने खरेदी करू शकतात. ग्राहकांना हे सोने एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून खरेदी केलेले सोने एमएमटीसी-पीएएमपीकडून चालवण्यात येणाऱ्या गोल्ड एक्युम्युलेशन प्लॅन म्हणजेच जीएपीमध्ये स्टोर केले जाईल. हे खरेदी केलेले सोने ग्राहकाच्या गुगल पे खात्याच्या गोल्ड लॉकरमध्ये दिसेल.

Chinese company Bonus Video
टेबलावर ७० कोटी रूपयांचा ढीग… १५ मिनिटांत जेवढे मोजाल तेवढे घेऊन जा; बोनस वाटपाचा Video Viral
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How to Check EPF Balance Using the UMANG App
तुमच्या EPF खात्यात पैसे जमा होतायत की नाही कसे ओळखाल? तर ‘या’ चार पद्धती ठरतील तुमच्यासाठी खूपच कामाच्या
success story of sahil pandita once washed vessels now owning business of 2 crores dvr 99
“भांडी घासली, टॉयलेट साफ केलं”, नोकरी करताना मिळायचे मोजकेच पैसे, पण आता उभारली कोटींची कंपनी; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास
Pune Doctor funny medicine prescription viral on social media
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Madhabi Puri Buch ANI
माधवी पुरी-बुच यांना सेबीच्या अध्यक्षपदी मुदतवाढ नाहीच; अर्थ मंत्रालयाने मागवले इच्छूक उमेदवारांचे अर्ज
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
Funny puneri pati goes viral puneri pati in temple goes viral on social media
PHOTO: “हे फक्त पुणेकरच करु शकतात” पुणेकरांनी देवाच्या बाजूला लावली अशी पाटी की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

मेसेजला लगेच रिप्लाय मिळाला नाही तर तुमचीही चिडचिड होते? जाणून घ्या यामागचं कारण

या लॉकरच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याची खरेदी किंवा विक्री झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती मिळू शकणार आहे. यासाठी तुमचे गुगल पे गोल्ड लॉकर तुमच्या फोनच्या सिम आणि मोबाइल नंबरशी लिंक केलेले असावे. जर तुम्ही तुमचा फोन किंवा सिमकार्ड बदलले तर अकाउंट पुन्हा प्राप्त करण्याकरिता नंबर व्हेरिफाय करावा लागेल. नंबर व्हेरिफाय झाल्यावर लगेचच गोल्ड लॉकरमधील सर्व जुने व्यवहार पुन्हा दिसू लागतील. जर तुम्हालाही सोने खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर खाली दिलेली प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.

गुगल पेवर सोने कसे खरेदी करावे? (How to Buy Gold on Google Pay?)

  • गुगल पे अ‍ॅप सुरु करा.
  • न्यू बटणावर क्लिक करा
  • सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करून त्यावर क्लिक करा.
  • आता बाय (Buy) वर क्लिक करा. तुम्‍हाला करासह वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. तुम्ही सोने खरेदी सुरू करताच, त्याची किंमत पाच मिनिटांसाठी लॉक राहते. प्रदेशानुसार कर वेगवेगळे असू शकतात
  • आता जितक्या रकमेचे सोने खरेदी करायचे आहे तितकी रक्कम भरा. एका दिवसात तुम्ही केवळ ५० हजार रुपयांची खरेदी करू शकता. किमान १ रुपयाचे सोने खरेदी करण्याचीही संधी आहे. ४९,९९९ रुपयांच्या वरच्या खरेदीसाठी केवायसी द्यावा लागेल.
  • आता चेक मार्क बटण दाबा
  • आता विंडोमध्ये तुमची पेमेंट पद्धत निवडा आणि ‘पेमेंट करण्यासाठी पुढे जा’ बटण दाबा. तुमचे पेमेंट झाल्यानंतर काही मिनिटांत ते लॉकरमध्ये दिसेल
  • एकदा व्यवहार सुरू झाला की तो रद्द करता येत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या वेळच्या दराने सोने विकू शकता. पेमेंट अयशस्वी झाल्यास, पुढील तीन व्यावसायिक दिवसांमध्ये पैसे परत केले जातात.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

गुगल पेवर सोन्याची विक्री कशी करावी? (How to Sell Gold on Google Pay?)

  • गुगल पे अ‍ॅप सुरु करा.
  • न्यू बटणावर क्लिक करा
  • सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करून त्यावर क्लिक करा.
  • आता सेल (Sell) वर क्लिक करा. तुम्‍हाला वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. व्यवहार सुरू झाल्यानंतर आठ मिनिटांसाठी किंमत लॉक केली जाते. सोने विक्रीवर कोणताही कर नाही. आता तुम्हाला किती ग्रॅम सोनं विकायचे आहे ते टाका. सध्याचे बाजार मूल्य दाखवले जाईल त्याच्या आधारावर तुम्ही जास्तीत जास्त २ लाख आणि किमान १ रुपयाचे सोने विकू शकता.
  • आता चेक मार्क वर क्लिक करा. विक्रीची पुष्टी झाल्यानंतर, पैसे तुमच्या गुगल पे खात्यामध्ये दिसतील

Story img Loader