Google Pay वर केवळ पैसेच ट्रान्सफर केले जात नाहीत तर या माध्यमातून आणखी काही कामे देखील अगदी जलद पद्धतीने करता येतात. अशाच पद्धतीने आपण सोन्याची ऑनलाइन खरेदी आणि विक्री देखील करू शकतो. जर तुम्हाला सोन्याची ऑनलाइन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर गुगल पे आपल्याला मदत करू शकतो. गुगल पेने हे काम एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून सुरु केले आहे. याची माहिती गुगल पेने आपल्या पेजवर दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुगल पेचे असे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक त्यांच्या गुगल पेवरून ९९.९९ टक्के शुद्ध २४ कॅरेट सोने खरेदी करू शकतात. ग्राहकांना हे सोने एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून खरेदी केलेले सोने एमएमटीसी-पीएएमपीकडून चालवण्यात येणाऱ्या गोल्ड एक्युम्युलेशन प्लॅन म्हणजेच जीएपीमध्ये स्टोर केले जाईल. हे खरेदी केलेले सोने ग्राहकाच्या गुगल पे खात्याच्या गोल्ड लॉकरमध्ये दिसेल.
मेसेजला लगेच रिप्लाय मिळाला नाही तर तुमचीही चिडचिड होते? जाणून घ्या यामागचं कारण
या लॉकरच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याची खरेदी किंवा विक्री झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती मिळू शकणार आहे. यासाठी तुमचे गुगल पे गोल्ड लॉकर तुमच्या फोनच्या सिम आणि मोबाइल नंबरशी लिंक केलेले असावे. जर तुम्ही तुमचा फोन किंवा सिमकार्ड बदलले तर अकाउंट पुन्हा प्राप्त करण्याकरिता नंबर व्हेरिफाय करावा लागेल. नंबर व्हेरिफाय झाल्यावर लगेचच गोल्ड लॉकरमधील सर्व जुने व्यवहार पुन्हा दिसू लागतील. जर तुम्हालाही सोने खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर खाली दिलेली प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.
गुगल पेवर सोने कसे खरेदी करावे? (How to Buy Gold on Google Pay?)
- गुगल पे अॅप सुरु करा.
- न्यू बटणावर क्लिक करा
- सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करून त्यावर क्लिक करा.
- आता बाय (Buy) वर क्लिक करा. तुम्हाला करासह वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. तुम्ही सोने खरेदी सुरू करताच, त्याची किंमत पाच मिनिटांसाठी लॉक राहते. प्रदेशानुसार कर वेगवेगळे असू शकतात
- आता जितक्या रकमेचे सोने खरेदी करायचे आहे तितकी रक्कम भरा. एका दिवसात तुम्ही केवळ ५० हजार रुपयांची खरेदी करू शकता. किमान १ रुपयाचे सोने खरेदी करण्याचीही संधी आहे. ४९,९९९ रुपयांच्या वरच्या खरेदीसाठी केवायसी द्यावा लागेल.
- आता चेक मार्क बटण दाबा
- आता विंडोमध्ये तुमची पेमेंट पद्धत निवडा आणि ‘पेमेंट करण्यासाठी पुढे जा’ बटण दाबा. तुमचे पेमेंट झाल्यानंतर काही मिनिटांत ते लॉकरमध्ये दिसेल
- एकदा व्यवहार सुरू झाला की तो रद्द करता येत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या वेळच्या दराने सोने विकू शकता. पेमेंट अयशस्वी झाल्यास, पुढील तीन व्यावसायिक दिवसांमध्ये पैसे परत केले जातात.
गुगल पेवर सोन्याची विक्री कशी करावी? (How to Sell Gold on Google Pay?)

- आता सेल (Sell) वर क्लिक करा. तुम्हाला वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. व्यवहार सुरू झाल्यानंतर आठ मिनिटांसाठी किंमत लॉक केली जाते. सोने विक्रीवर कोणताही कर नाही. आता तुम्हाला किती ग्रॅम सोनं विकायचे आहे ते टाका. सध्याचे बाजार मूल्य दाखवले जाईल त्याच्या आधारावर तुम्ही जास्तीत जास्त २ लाख आणि किमान १ रुपयाचे सोने विकू शकता.
- आता चेक मार्क वर क्लिक करा. विक्रीची पुष्टी झाल्यानंतर, पैसे तुमच्या गुगल पे खात्यामध्ये दिसतील