Apple iPhone SE Flipkart वरून १४,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. ॲप्पलच्या स्वस्त iPhone SE वर Flipkart वर ९०९१ रुपयांची घवघवीत सूट मिळत आहे. ही सवलत iPhone SE च्या सर्व प्रकारांवर उपलब्ध आहे. Apple iPhone SE चे बेस व्हेरिएंट ६४जीबी स्टोरेज आहे, ज्याची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर १२८जीबी ३४,९९९ रुपये आणि २५६ जीबी ४४,९९९ रुपये आहेत.

Apple iPhone SE ऑफर

Apple iPhone SE कमी किंमतीत आणि एक्सचेंज ऑफरसह स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. फ्लिपकार्टवर जुन्या फोनवर १७,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळतआहे. तुम्ही जुना iPhone 11 एक्सेंच केल्यास, फ्लिपकार्टवर त्याची किंमत १६,००० रुपये आहे. iPhone SE च्या या उपलब्ध ऑफरसह १३,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसंच Flipkart वर SBI क्रेडिट कार्डवर सुद्धा १० टक्के सूट मिळत आहे. यासोबतच अॅक्सिस बँकेच्या कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

( हे ही वाचा: तुम्हाला देखील Adults Ads येत आहेत का? गुगल अशा नोटिफिकेशन्स का पाठवतंय, हे आहे कारण)

Apple iPhone SE तपशील

Apple iPhone SE च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ४.७ इंचाचा रेटिना HD डिस्प्ले आहे. आयफोनच्या या फोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यात ३rd जनरेशन न्यूरल इंजिन प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी iPhone SE मध्ये १२एमपी रियर कॅमेरा आणि ७एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा आयफोन जलद चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

फ्लिपकार्टने नुकतीच iPhone 11 आणि iPhone 12 च्या किमतीत कपात केली आहे. iPhone 11 चे ६४जीबी स्टोरेज मॉडेल ४१,९९९ रुपयांना आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेल ४६,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone 12 चे ६४जीबी मॉडेल ५३,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी, iPhone 12 चे १२८जीबी स्टोरेज मॉडेल ५८,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी, २५६जीबी मॉडेल फ्लिपकार्ट वरून ६२,९९९ रुपयांना खरेदी केले येऊ शकते.

Story img Loader