Google smartphone: गुगलने काही दिवसांपूर्वीच Google Pixel 6a प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला होता. तेव्हापासून या फोनला जबरदस्त डिमांड आहे. स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा आणि त्याचा डिस्प्ले आणि परफॉर्मेंस जबरदस्त आहे. परंतु या स्मार्टफोनची किंमत थोडी जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराज व्यक्त होत होती. मात्र, त्यांना खुश करण्यासाठी फ्लिपकार्ट मोठी डील घेऊन आले आहे. या डीलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

काय आहे ऑफर ?

silver button of YouTube in the hand of a monkey
आईशप्पथ, चक्क माकडाच्या हातात यूट्यूबचे सिल्व्हर बटण… VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार

गुगलचा Pixel 6a हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तेव्हा या स्मार्टफोनची किंमत ४३,९९९ रुपये इतकी होती. आता हा स्मार्टफोन तुम्ही १२ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर १३,००० रुपयांच्या सवलतीनंतर सध्या त्याची किंमत ३० हजार ९९९ रुपये झाली आहे. कंपनी या फोनवर १८,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे. तुम्हाला जुन्या फोनसाठी पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाल्यास Google Pixel 6a तुम्ही १२,४९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

आणखी वाचा : खुशखबर! iPhone 11 आता २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची मोठी संधी; पाहा डिटेल्स

Google Pixel 6a ची फीचर आणि स्पेसिफिकेशन

Google Pixel 6a चे डिझाइन सीरिजचे इतर मॉडेल्स Pixel 6 आणि Pixel 6 Pro प्रमाणेच आहे. यात मेटल फ्रेमसह पुढील बाजूला गोरिल्ला ग्लास आणि मागील बाजूला प्लास्टिक पॅनेल दिले आहे. फोनला वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसाठी आयपी ६७ सर्टिफिकेशन मिळाले आहे. डिस्प्लेबद्दल सांगायचे तर यात ६.१ इंच फुलएचडी+ OLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.

यात Google Tensor चिपसेटसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा दिला असून, यात एफ/१.७ अपर्चर आणि OIS सह १२.२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १८ वॉट वायर्ड चार्जिंगसह ४४०० एमएएच बॅटरी दिली असून, कंपनीचा दावा आहे की, ही २४ तासांचा बॅकअप देते. याशिवाय, स्टीरियो स्पीकर, ऑलवेज ऑन डिस्प्ले, ५जी कनेक्टिव्हिटी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, ड्यूल माइक आणि एचडीआर सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.