5G Smartphone Offer: देशात सध्या स्मार्टफोनचा (Smartphone) बोलबाला आहे. बहुतेक लोक या स्मार्टफोनचा वापर करतात. पण यावेळी आपल्याला हेही विसरून चालणार नाही की, आपल्या देशातील अनेक लोक ही दारिद्र्यरेषेच्या खाली जगणारी आहे. त्यामुळे ते स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम नाहीत. त्यांना साध्या फीचर फोनवर समाधान मानावे लागते. या वर्गाच्या समस्या लक्षात घेता आज आम्ही तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आले आहोत. तुम्हाला जबरदस्त फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन केवळ ५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणता स्मार्टफोन तुम्हाला कुठे स्वस्तात मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जबरदस्त फीचर्स असणारा ‘हा’ 5G स्मार्टफोन स्वस्तात

जबरदस्त फीचर्स असणारा Infinix Smart 6 HD तुम्ही केवळ ५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे.

(हे ही वाचा : OnePlus Pad: देशात धुमाकूळ घालायला येतोय वन प्लसचा पॅड; जाणून घ्या किंमत आणि रंजक फीचर्स )

सवलत ऑफर

Infinix Smart 6 HD या स्मार्टफोनची किंमत ८,००० रुपये असली तरी फ्लिपकार्टवर त्याची किंमत कमी आहे. ३५ टक्के डिस्काउंटनंतर तो ५,७९९ रुपयांना मिळत आहे. अधिक डिस्काउंटसह फोन खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर इतर ऑफर दिल्या आहेत.

एक्सचेंज ऑफर

यावर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी, तुमच्याकडे उत्तम कंडिशनचा स्मार्टफोन असावा. Infinix Smart 6 HD Flipkart वर ५,२०० रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जात आहे. जर याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळाला तर या फोनची किंमत फक्त ५९९ रुपये असू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy infinix smart 6 hd 5g smartphone with 5000 mah battery on flipkart for rs 599 pdb